नवी दिल्ली, 18 मे : एकिकडे भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Coronavirus second wave) लढा देतो आहे. आता कुठे देशातील कोरोना प्रकरणं नियंत्रणात येत आहेत. अशात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Coronavirus third wave) भीती व्यक्त केली जाते आहे आणि ही लाट लहान मुलांसाठी महाभयंकर ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत मोदी सरकारला सावध केलं आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचा असा स्ट्रेन (Singapore corona new strain) आढळून आला आहे, ज्यामुळे लहान मुलांना अधिक संसर्ग होतो आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन लहान मुलांसाठी खूपच धोकादायक असून तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात तो भारतात येऊ शकतो, असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. त्यामुळे सिंगापूर-भारत विमानसेवा थांबवावी असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.
सिंगापुर में आया कोरोना का नया रूप बच्चों के लिए बेहद ख़तरनाक बताया जा रहा है, भारत में ये तीसरी लहर के रूप में आ सकता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 18, 2021
केंद्र सरकार से मेरी अपील:
1. सिंगापुर के साथ हवाई सेवाएं तत्काल प्रभाव से रद्द हों
2. बच्चों के लिए भी वैक्सीन के विकल्पों पर प्राथमिकता के आधार पर काम हो
ट्वीटमध्ये सीएम केजरीवाल म्हणाले, “सिंगापूरमध्ये आढळलेलं कोरोनाचं नवं रूप लहान मुलांसाठी खूपच भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. भारतात हा तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो. केंद्र सरकारला मी आवाहन करतो की त्यांनी सिंगापूरसोबतची विमानसेवा तात्काळ रद्द करावी आणि लहान मुलांच्या लशीला पर्याय काय असू शकतो, यावर प्राधान्याने काम व्हायला हवं”