मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भारतात वाढतायत ‘हे’ तीन गंभीर आजार, कोरोनासोबत याकडेही ठेवा लक्ष

भारतात वाढतायत ‘हे’ तीन गंभीर आजार, कोरोनासोबत याकडेही ठेवा लक्ष

भारतात (India) गेल्या काही वर्षात गंभीर आजारांचं (Series illness) प्रमाण वाढत असल्याचं सिद्ध झालं असून त्यात ब्रेन कॅन्सर, (Brain cancer) स्ट्रोक (stroke) आणि अल्झायमर (Alzheimer) यांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली, 15 जुलै : भारतात (India) गेल्या काही वर्षात गंभीर आजारांचं (Series illness) प्रमाण वाढत असल्याचं सिद्ध झालं असून त्यात ब्रेन कॅन्सर, (Brain cancer) स्ट्रोक (stroke) आणि अल्झायमर (Alzheimer) यांचा समावेश आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी (Corona Virus) लढा देण्यात व्यस्त असताना या तीन आजारांचं भारतातील प्रमाण वाढत असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. हे सर्व आजार लाईफस्टाईलशी (Lifestyle) संबंधित असून खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपण्याच्या बदलणाऱ्या वेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यातून अशा आजारांना आमंत्रण मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘द लेंसेट ग्लोबल हेल्थ जर्नल’मध्ये न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 1990 पासून 2019 पर्यंतच्या तीस वर्षांच्या कालावधीत या रोगांना बळी पडणाऱ्यांचं प्रमाण दुप्पट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढणं ही बाब अत्यंत चिंताजनक असून कनिष्ठ आणि मध्यमवर्ग अधिक प्रमाणात असणाऱ्या भारतासारख्या देशाला ही बाब परवडणारी नसल्याचंदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे. केरळ आणि ईशान्येत ‘स्ट्रोक’चा प्रभाव केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये स्ट्रोकचा त्रास होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अधिक असून छत्तीसगड, ओरिसा,  आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये स्ट्रोकचा त्रास असणाऱ्या आणि अल्झायमरच्या रुग्णांची संख्या गेल्या 30 वर्षांत दुप्पट झाली आहे. तर तमिळनाडू, जम्मू काश्मीर, लडाख, केरळ आणि गोव्यात न्युरॉलॉजिकल डिसऑर्डर असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. हे वाचा -दक्षिण आफ्रिकेत बेबंदशाही! 72 लोकांनी गमावले आपले प्राण; भर शहरात हिंसाचार या कारणामुळे वाढतायत रोग भारतात बदलत चाललेली जीवनशैली हेच यामागील मोठं कारण असल्याचं डॉ. मंजिरी त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. खाणंपिणं आणि व्यायाम यांच्या अभावामुळे अशा रोगांना आमंत्रण मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर अधिकाधिक वेळ असणे, बाहेर फिरण्याचं प्रमाण कमी होणे, वाढता तणाव आणि झोपेच्या चुकीच्या वेळा यामुळे हे आजार बळावत चालल्याचं डॉ. त्रिपाठी यांचं म्हणणं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Brain stroke, Cancer, Lifestyle

    पुढील बातम्या