तेलकट केसांपासून सुटका : आपण पाण्यात समुद्री मीठ टाकून, केस धुवून किंवा शॅम्पूमध्ये समुद्री मीठ टाकून तेलकट केसांपासून सुटका मिळवू शकता. वास्तविक, समुद्रातील मीठ डोक्याच्या त्वचेच्या मृत पेशी काढून तेल ग्रंथींचे सीबम उत्पादन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे केसांवरील अतिरिक्त ऑईल कमी होऊ लागते.
केस गळती थांबेल : समुद्राच्या मीठाने स्कॅल्पला मसाज केल्याने केसगळती कमी होते. स्कॅल्पवर समुद्री मीठ चोळल्याने त्यावर साचलेली घाण साफ होते आणि स्कॅल्पची छिद्रेही सहज उघडतात. यामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील हळूहळू कमी होते.
रक्ताभिसरण सुधारते : मॅग्नेशियम, कॅल्शियम, जस्त, सल्फर, ब्रोमाइड आणि क्लोराईड यांसारखी खनिजे सागरी मिठात असतात, त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते. यासाठी समुद्रातील मीठ पाण्यात विरघळवून किंवा शाम्पूमध्ये समुद्री मीठ घालून केस धुवू शकता
कोंडा निघून जाईल : केसांमध्ये सागरी मीठ नियमितपणे लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो. यासोबतच अँटी-बॅक्टेरियल घटक असलेले समुद्री मीठ केसांमधील ओलावा टिकवून ठेवत असल्याने कोंड्यामुळे होणारा त्रास कमी करते.
हेअर एक्सफोलिएटर : केमिकलवर आधारित हेअर प्रोडक्टसमुळे केसांचे नुकसान होते. तर पौष्टिक समृद्ध समुद्री मीठ केसांसाठी नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून कार्य करते. केस धुताना शॅम्पूमध्ये समुद्री मीठ टाकल्याने केस लांब, दाट, मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)