Home /News /lifestyle /

प्रेमात का मिळतो धोका? शास्त्रज्ञांनी 12 मुद्द्यांमध्ये सांगितली प्रेमाची खरी कहाणी

प्रेमात का मिळतो धोका? शास्त्रज्ञांनी 12 मुद्द्यांमध्ये सांगितली प्रेमाची खरी कहाणी

प्रत्येक प्रेमकथेचा (Love story) शेवट आनंदी होतोच असं नाही. या प्रवासात फसवणूक, दुःख देखील वाट्याला येतं. प्रेम, सामंजस्य आणि नंतर फसवणूक यामागे शास्त्रीय कारण आहे का, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडलाच असेल.

मुंबई, 21 जानेवारी: एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटताच, त्याची प्रत्येक गोष्ट अगदी आपल्यासारखीच आहे, असं तुम्हाला वाटू लागतं. तुम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहात, असं देखील क्षणभर वाटतं. त्यानंतर प्रेम (Love) वाढू लागतं आणि नव्या नात्याला (Relation) सुरवात होते. मात्र प्रत्येक प्रेमकथेचा (Love story) शेवट आनंदी होतोच असं नाही. या प्रवासात फसवणूक, दुःख देखील वाट्याला येतं. प्रेम, सामंजस्य आणि नंतर फसवणूक यामागे शास्त्रीय कारण आहे का, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडलाच असेल. त्यावर हा केवळ हृदयाचाच नाही तर शरीरातील रसायनांचाही (Chemical) खेळ असतो, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. अशी काय जादू आहे की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्रेमात पडल्यावर इतर जग परकं वाटायला लागतं, एक व्यक्ती वगळता सर्व काही निरुपयोगी आणि चुकीचं दिसतं, या गोष्टी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत. मात्र ही जादू नसून, एक रासायनिक प्रतिक्रिया आहे, की जी तुमच्या मनाला असा विचार करायला भाग पाडते, असं विज्ञान म्हणतं. यासंबंधीचा अहवाल जर्नल ऑफ कॉम्पेरेटिव्ह न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. हा अहवाल रुटगर्स युनिव्हर्सिटीतील मानववंशशास्त्रज्ञ हेलेन फिश आणि त्यांच्या टिमनं तयार केला आहे. हे वाचा-जेवणाचा प्रत्येक घास 32 वेळा चावून खायचा का? वाचा काय आहे तथ्य आणि फायदे 12 मुद्द्यांच्या आधारे ऐका प्रेमाची कहाणी 2017 मध्ये अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल बिहेवियरमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, शरीरात डोपामाइन (Dopamine) नावाचं रसायन अधिक प्रमाणात स्त्रावल्यानं, आपण बहुतेक वेळा एकाच व्यक्तीबाबत विचार करत असतो. म्हणजेच या रसायनामुळे तुमचं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रीत राहतं आणि तुम्हाला संपूर्ण जग निरुपयोगी वाटू लागतं सेंट्रल नॉरपेनेफ्रिल नावाचं रसायन तुमच्या शरीरात स्त्रवतं, त्यामुळे एकाच गोष्टीची वारंवार आठवण येत राहते. ही क्रिया प्रेमाच्या दुसऱ्या टप्प्यात पाहायला मिळते. जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजीच्या मते, व्यक्तीला त्याच्या जोडीदारातील सर्व गुण चांगले आहेत आणि हे जग नकारात्मक आहे, असं वाटू लागतं. एकूणच तुम्ही अशा काळात स्वप्नांच्या दुनियेत (Dream world) असता. प्रेमात पडल्यावर झोप उडते, भूकही लागत नाही, असं तुम्ही ऐकलंच असेल. हृदयाची धडधड वाढणं, श्वासाची गती वाढणं, बेचैनी आणि तणाव यामुळे तुम्ही एखाद्या नशा करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे जगापासून अलिप्त होता. फिलॉसॉफी, सायकियाट्री अँड सायकॉलॉजी या जर्नलमध्ये 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, प्रेम हे शरीरावर एखाद्या ड्रग्जसारखं (Drugs) काम करतं. त्यामुळे ही नशा उतरतातच माणसाला अशक्त झाल्यासारखं वाटतं. हे वाचा-Kundali Gun Milan: लग्नासाठी कोणते असतात 36 गुण? इतके गुण जुळले तरच करा शुभमंगल! मानवशास्त्रज्ञ हेलेन फिश यांच्या मते, सेंट्रल डोपामाइन या हॉर्मोनमुळे (Hormone) तीव्र आकर्षण निर्माण होतं. अशा परिस्थितीत जर प्रियकर किंवा प्रेयसी एखाद्या गोष्टीमुळे दुःखी असतील तर त्यांच्यातील आकर्षण झपाट्यानं वाढतं. इतकंच नाही तर त्याचं एकमेकांशी भांडण झाल्यावर या हॉर्मोन्सचे न्यूरॉन (Neuron) अधिक सक्रिय होतात. याची पुढची पायरी म्हणजे प्रियकर किंवा प्रेयसीचं वर्तन विचित्र होऊ लागतं. 2012 मध्ये जर्नल ऑफ सायकोफिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीची 85 टक्के विचारसरणी केवळ एकट्या व्यक्तीच्या विचारांनी व्यापलेली असते. त्यामुळे हे मानसिक आजारी असण्यासारखं आहे. हे मेंदूतील सेरोटॉनिन (serotonin) हॉर्मोनची पातळी कमी झाल्यानं होतं. या काळात भावनिक अवलंबित्व वाढतं. अशा काळात स्वतःला बळ देण्याऐवजी दुसऱ्याची मदत घ्यावीशी वाटते. अशावेळी मेंदूतील सिंग्युलेट गायरिस नावाचा एक भाग सक्रिय होतो आणि संबंधित व्यक्तीची अवस्था व्यसनाधीन व्यक्तीसारखी होते. प्रेमाच्या पुढील टप्प्यात माणूस भविष्यातील आयुष्याची स्वप्न पाहू लागतो. यावेळी सेरॉटेनिन हॉर्मोनची पातळी कमी होते आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतो. त्याच्या न्युरोट्रान्समीटरमुळे व्यक्तीचे जोडीदारासोबत असलेले संबंध अधिक गहिरे होऊ लागतात, असं हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालात म्हटलं आहे. प्रेमाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, या काळात संबंधित व्यक्तीची सहानुभूतीची भावना अधिक तीव्र असते. उदाहरण द्यायचं झालं तर संबंधित व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या दुःखात सहभागी होऊन, जोडीदारासाठी प्रसंगी कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यास तयार होते. शरीरातील मिरर न्यूरॉन्समुळे असं होत असल्याचं हेलेन फिशर यांच्या अभ्यासात म्हटलं आहे. हे वाचा-Sex Education | तुमच्या नीरस लैंगिक जीवनात असे भरा रंग, दोघांनाही मिळेल आनंद प्रेमात लोक एकमेकांच्या सर्व आवडीनिवडी स्वीकारतात, अशावेळी त्यांना स्वतःची देखील पर्वा नसते. हेदेखील हॉर्मोनमुळे होतं. टेस्टेस्टेरॉन (Testosterone) हॉर्मोनमुळे असं घडतं आणि तुमचं जोडीदाराशी असलेलं नातं अधिक घट्ट होतं. इंडियन जर्नल ऑफ एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझमनुसार, ऑक्सिटॉक्सिन हॉर्मोन प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीचा पझेसिव्हनेस वाढवतो. जोडीदाराशी असलेल्या तीव्र भावनिक नात्यामुळं तुम्ही अन्य कोणत्याही गोष्टी सहन करू शकत नाही आणि तुमची हक्काची भावना वाढते. हेलेन फिशर म्हणतात की, 'नात्याच्या पुढच्या टप्प्यावर, नातेसंबंध भावनिकतेकडून भौतिक गोष्टीकडं जाऊ लागतात. 2002 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, 64 टक्के लोकांनी प्रेमात शारीरिक संबंधांना महत्त्व दिलं होतं. इतकंच नाही तर प्रेमात पडलेला माणूस स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसतो आणि त्याला प्रेमापुढं समाज, संस्कृती, देश, कायदा यापैकी काहीही आठवत नाही'. हेलेन फिशर यांनी सांगितलं की, 'प्रेम ही खरं तर तात्पुरती प्रक्रिया आहे. कोणतीही व्यक्ती दुसऱ्याच्या प्रेमात जास्त काळ राहू शकत नाही. ही अवस्था काही महिने किंवा वर्षानंतर संपुष्टात येते. या संबंधात पूर्वीसारखं आकर्षण राहत नाही. जर असे संबंध नैसर्गिक पध्दतीनं चालू राहिले तर ते 3 वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नसल्याचं अनेक मानसशास्त्रज्ञ मान्य करतात'.
First published:

Tags: Love

पुढील बातम्या