मुंबई, 20 जुलै: साडी म्हटलं की महिलांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय. अशातच जर कोणी 150 रुपयात साडी विक्री करत असेल तर त्या दुकानांमध्ये महिलांची मोठी गर्दी जमताना दिसून येते. मुंबई च्या दादरमध्ये एका ठिकाणी चक्क 150 रुपयात साड्या मिळत आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या साड्या ही कमी किंमतीत घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे.
दादरच्या पूर्वेस असलेल्या हिंदमाता बाजारपेठेतील प्राची फॅशन या दुकानात 150 रुपयात साड्या उपलब्ध आहेत. हे प्राची साडीच दुकान होलसेल असून या ठिकाणी बाजारभावापेक्षा कमी किंमतीत अनेक प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. या ठिकाणी मानपानाच्या साड्यांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचबरोबर या साडीच्या दुकानात लग्नासाठी आणि पार्टीवेअर साड्या यादेखील कमी दरात उपलब्ध आहेत.
150 रुपयांच्या साडीचे वैशिष्ट्य?
आजही अनेक महिला घरकाम करताना साडी परिधान करतात. घरकाम करताना सातत्याने वापरात येणाऱ्या साड्या तशा लवकरात खराब होतात. सततच्या वापरामुळे त्याचा नवीनपणा निघून जातो. कार्यक्रमाच्या हेवी वर्क असलेल्या साड्या महिला रोज नेसण्यास टाळतात. अशावेळी त्या साध्या साड्यांना प्राधान्य देतात. काही गरीब महिला या महागातल्या साड्या मोजक्याच खरेदी करू शकतात. त्यामुळे त्या महिला रोजच्या वापरातील साध्या साड्यांना प्राधान्य देतात.
अशावेळी या साध्या साड्या आपल्याला स्वस्त दरात कुठे मिळतील याचा शोध सुरू होतो. 150 रुपयांची ही साडी अगदीच अफोर्डेबल असल्या कारणाने प्राची फॅशनमध्ये प्रत्येक वर्गातील महिला या ठिकाणी साड्या खरेदी करण्यास पसंत करतात, अशी माहिती येथील व्यवस्थापक योगेश शेलारे यांनी दिली.
Mumbai News : मुंबईकरांनो, फक्त 1 रुपयात खरेदी करा कानातले, विश्वास बसत नसेल तर पाहा Video
कोणत्या मिळतात साड्या?
प्राची फॅशन हे साडीच दुकान गेले दहा वर्षांपासून साडी विक्रीचे होलसेल आणि रिटेल व्यापार करत आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या साड्या या बाजारभावाच्या दरांपेक्षा कमी दरात उपलब्ध आहेत. नेहमीचा वापरातील साध्या साड्या प्रमाणेच कांजीवरम, पैठणी, पेशवाई, सेमी पैठणी, ऑरगॅनजा, गार्डन, काटपदर, सिल्क, साउथ इंडियन, पार्टीवेअर, ब्रॉकेट त्याचप्रमाणे ब्रायडल लेहंगा यांची किंमत या ठिकाणी 300 रुपयांपासून सुरू होते ते 3 हजार पर्यंतच्या रेंजमध्ये सर्व प्रकारच्या साड्या या दुकानात उपलब्ध आहेत. या सर्व साड्या येवला, सुरत, कर्नाटक मधून मागतो, अशी माहिती योगेश शेलारे यांनी दिली.