मुंबई, 29 जून : दागिने हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कानातले, नेकलेस, बाजूबंद, बांगड्या, कंबरपट्टा, पैंजण हे सर्व दागिणे प्रत्येक वयोगटातली महिला हौसेनं खरेदी करते. आपल्याकडं असलेल्या ड्रेसवर मॅचिंग असा दागिना घेण्याची त्यांची इच्छा असते. पण, वाढत्या महागाईमुळे ते सर्वांना नेहमी शक्य होत नाही. पण, आता काळजी करू नका. कारण मुंबईतील मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांपासूनचे कानातले खरेदी करता येतात. फक्त 1 रुपयात कानातले! कोणत्या कपड्यांवर कोणता दागिना खुलून दिसेल याचा अंदाज महिलांना असतोच. या दागिन्यांमध्ये कानातले तर अनेकजणी रोज बदलतात. ड्रेसवर साजेसे ट्रेन्डी कानातले, साडीवर हेवी वर्क असलेले, वेस्टर्न वेअर आणि टॉप्सवर मॅच होतील अशा रिंग्स खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
रोज नवं कानातले घालायचे असतील तर ते स्वस्त दरात कुठे खरेदी करता येतील याचा विचार करत असाल तर तुमचा शोध इथं संपेल. मुंबईतल्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयामध्ये कानातल्याचे जोड मिळतात.या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किंमतीमध्ये कानातले मिळतात. त्याचबरोबर 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये खड्यांचे कडे इथं खरेदी करता येतात. पावसाळ्यात हवाय ट्रेंडी लूक, 300 रुपयांपासून मिळेल टॅाप्स, कुठे? VIDEO महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत सातत्यानं वाढत आहे. कोरोना व्हायरसनंतर महागाईमध्ये काहीपट वाढ झालीय. पण, मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये होलसेल दरात वेगवेगळी खरेदी करता येते. अनेक मुंबईकर लग्नाचा बस्ता इथंच खरेदी करतात. त्याचबरोबर दैनंदीन वापरासाठी दागिने आणि कपडेही इथं स्वस्त दरामध्ये मिळतात. पण, अवघ्या 1 रुपयांमध्ये कानातलं मिळाणारं मुंबईतील हे शॉप सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठा खजिना आहे.