जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चुकूनही समोसा खाल तर होईल शिक्षा; इथं पूर्णपणे Samosa Ban कारण...

चुकूनही समोसा खाल तर होईल शिक्षा; इथं पूर्णपणे Samosa Ban कारण...

चुकूनही समोसा खाल तर होईल शिक्षा; इथं पूर्णपणे Samosa Ban कारण...

इथं समोसा बनवाल, विकाल, खाल तर तुम्हाला महागात पडू शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मोगादिशू, 03 मार्च :  गरमागरम, खुसखुशीत समोसा खायला कुणाला आवडत नाही. काही जणांनाचा तर फेव्हरेट ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स आहे. पण तुमच्या या फेव्हरेट समोश्यावर एका ठिकाणी बंदी आहे. समोसा बनवणं, विकणं आणि खाण्यास मनाई आहे. इथं लोक चुकूनही समोसा खात नाही. नाहीतर शिक्षा ठोठावली जाते (Samosa ban). आपल्याकडे घरात पाहुणे आले किंवा कोणता कार्यक्रम असेल तर समोसा हमखास असतो. असं असताना एका ठिकाणी मात्र लोक समोसा बिलकुल खात नाहीत आणि हे ठिकाण म्हणजे सोमालिया (Samosa ban in somalia). या देशात समोसावर बंदी घालण्यात आली आहे. इथं समोसा बनवल्यास, विकल्यास, खरेदी केल्यास, खाल्ल्यास शिक्षा दिली जाते. हे वाचा -  OMG! ही तर ‘लेडी बाहुबली’; एकाच वेळी तब्बल 4-4 Gas Cylinder उचलते एकटी महिला आता समोश्यावर बंदी घालण्यासारखं इतकं त्यात काय आहे, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर सोमालियात समोश्यावर बंदी असण्यामागे विचित्र कारण आहे. समोश्यावर बंदीइतकंच त्यामागील कारणही आश्चर्यकारक आहे. एक नव्हे तर बरीच कारणं आहेत. समोश्याच्या बंदीचं एक कारण आहे ते म्हणजे त्याचा आकार. समोसा त्रिकोणी आकाराचा असतो. समोश्याचं त्रिकोणीय रूप ख्रिश्चन कम्युनिटीच्या जवळचं आहे, जे पवित्र चिन्हासारखं आहे, असं सोमालियातील एक समाज मानतो. हा समाज या चिन्हाचा सन्मान करतं म्हणून इथं समोसा बॅन आहे. हे वाचा -  VIDEO: संत्री सोलताच आतमध्ये दिसलं अतिशय अजब दृश्य; पाहून नेटकरीही शॉक काही रिपोर्टनुसार इथं उपासमारीने मृत्यू झालेल्या प्राण्यांच्या मांसाचा समोश्याच वापर केला जायचा हे आणखी एक कारण आहे. तसंच सोमालियात समोश्याला आक्रमकतेचं प्रतीक मानलं जातं, असं झी न्यूज हिंदीच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इथं समोसा पूर्णपणे बॅन करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात