• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • छळ, बलात्कार आणि खून... हे YouTubers हिट्स मिळवण्यासाठी गाठत आहेत विकृतीचं टोक

छळ, बलात्कार आणि खून... हे YouTubers हिट्स मिळवण्यासाठी गाठत आहेत विकृतीचं टोक

YouTube वर लोकप्रियता आणि पैसे मिळावेत म्हणून भयानक गोष्टी केल्या जात आहेत.

 • Share this:
  मॉस्को, 31 मार्च : रशियामधून युट्युबर्सचे (YouTubers in Russia) अनेक धक्कादायक व्हिडिओज सध्या समोर येत आहेत. या व्हिडिओजमध्ये  बरेच लोक इतर व्यक्तींचा छळ करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, घाणेरडे कृत्य करून अगदी आणि त्यानंतर त्यांचा जीवही घेतात. (russia news) रशियातलं प्रशासन हा जीवघेणी प्रकार संपवण्याचा प्रयत्न करतं आहे आणि पोलिसदेखील अश्या  युट्युबर्सना ट्रॅक करून ताब्यात घेण्यासाठी करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. याव्यतिरिक्त बरेच रशियन राजनेतेही तर युट्युबवरच  बंदी आणावी असं मत व्यक्त करत आहेत.  (youtubers in russia streaming violence) डिसेंबर 2020 मध्ये रशियातील एका स्टेस रिफेली नावाच्या यूट्यूबरवर आपल्या गर्लफ्रेडला मारून टाकण्याचा आरोप झाला होता. स्टेसवर असा आरोप आहे की त्यान आपल्या गर्लफ्रेंडला बाल्कनीमध्ये कडाकाच्या थंडीत विना कपड्याचं बसवलं होते. यामुळे तिचा मृत्यू झाला. स्टेस रिफेली हे सगळं आपल्या युट्युब  प्रेक्षकांसाठी करत होता आणि ही संपूर्ण घटना यूट्यूबवर थेट प्रसारित होत होती. (rape being streamed by Russian youtubers) हेही वाचा अंधश्रद्धेचा कहर! अमरावतीत 35 महिलांच्या अंगात देवी संचारल्याने भीतीचं वातावरण ही संस्कृती एवढी धोकादायक बनली आहे, की गेल्या काही महिन्यांत एका गरोदर महिलेचा बळी गेला. असेच एकदा ट्रॅश स्ट्रीममध्ये लाईव्ह स्ट्रीम करताना एका व्यक्तीला जाळलं गेलं. एका महिलेच्या डोक्यावर सतत टेबलनं मारताना देखील दाखवलं गेलं. याच महिन्यात काही ब्लॉगर्सवर असादेखील आरोप लावला होता, की एका महिलेच्या घरात घुसून तिला ड्रग्स दिले गेले आणि तिच्यावर बलात्कार केला गेला. हे सर्व  लाईव्ह स्ट्रीम केले गेले. (Russian youtubers trash streaming) महत्त्वाचं म्हणजे युट्युब अशा प्रकारचा कन्टेन्ट आणि लाईव्ह स्ट्रीम ब्लॉक करते. पण काही युट्यूबर्स ब्लॉक आणि सेंसरवरदेखील मात करतात. काहीवेळा युट्युब असे व्हिडिओ रिलीज झाल्यावर त्यांना ब्लॉक करतं. तरीही हे कन्टेन्ट क्रिएटर्स असे व्हिडिओ टेलीग्रामसारख्या अ‍ॅपद्वारे त्यांचे चाहते आणि फॉलोअर्सपर्यंत पोहचवतात. हेही वाचा अंधश्रद्धेचा कहर! अमरावतीत 35 महिलांच्या अंगात देवी संचारल्याने भीतीचं वातावरण पोलिसांनी याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना कळाले की ही व्यक्ती जाणूनबुजून अशा प्रयोगांमध्ये सहभागी होत होती. कारण यातून त्याचे हे व्हिडिओ खुप व्हायरल व्हायचे आणि यातूनच त्याला पैसे मिळायचे. करोना व्हायरससारखी साथ आलेली असतानादेखील बरेच लोक अशा व्हिडिओचा भाग बनून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: