सॅल्युट! आगीत हॉस्पिटल पेटलं तरी डॉक्टर करत राहिले रुग्णाची सर्जरी; पाहा VIDEO
रुग्णाला सोडून आगीतून आपला जीव वाचवण्याची पूर्ण संधी डॉक्टरांकडे होती. पण त्यांनी रुग्णाचा फक्त जीवच वाचवला नाही तर ऑपरेशनही यशस्वीरित्या पार (doctors performed surgery amid fire in the hospital) पाडलं.
मॉस्को, 03 एप्रिल : रुग्णसेवा हे आमचं प्रथम कर्तव्य आणि जबाबदारी असं व्रतच प्रत्येक डॉक्टर घेत असतो आणि ते पूर्ण करतानाही दिसतो. भले मग त्याच्या जीवावर बेतलं तरी रुग्णाच्या जीवासाठी तो धडपड असतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे तो रशियातील. जिथं हॉस्पिटलला आग (Hospital fire) लागली तरी डॉक्टर रुग्णाची सर्जरी (Surgery) करत राहिले. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती आणि ते त्यांनी केलंच (doctors performed surgery amid fire in the hospital). या डॉक्टरांचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
मॉस्कोतील ब्लागोवेशचेंस्क शहरातील एका रुग्णालयात आग लागली. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली. त्याचवेळी डॉक्टरांची एक टीम एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत होते. या रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी सुरू होती. आग लागली म्हटल्यावर रुग्णालयातील सर्वांची धावपळ सुरू झाली पण हे डॉक्टर काही आपल्या जागेवरून हलले नाहीत. कारण रुग्णाला त्यांनी तसंच सोडलं असतं किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला असता तर रुग्णाचा जीव धोक्यात होता. त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळे आगीतून आपला जीव वाचवून पळण्यापेक्षा त्यांनी रुग्णाचा जीव वाचवण्याला जास्त महत्त्व दिलं. रुग्णाची सर्जरी करत राहिले आणि त्यांनी याच परिस्थितीत ऑपरेशन पूर्णही केलं.
Russian doctors stayed behind in a burning, tsarist-era hospital in the country's Far East to complete open-heart surgery after a fire broke out on the roof while they were operating https://t.co/iGZf2xrGFRpic.twitter.com/sba27WquEM
रुग्णाचं ऑपरेशन करणारे सर्जन वॅलेन्टिन फिलाटोव्ह यांनी आरईएन टीव्हीशी हबोलताना सांगितलं, आम्ही आणखी काहीच करू शकत नव्हतो. आम्हाला कोणत्याही किमतीत या रुग्णाचा जीव वाचवायचा होता. आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने ते केलं. हे हृदयाचं ऑपरेशन होतं. रुग्णाला आम्ही असंच सोडू शकत नव्हतो.
एकिकडे ऑपरेशन सुरू होतं आणि दुसरी अग्निशमन दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते. त्यांनीसुद्धा दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता. रुग्णालयाच्या वरच्या बाजूला उंचावर आगीच्या ज्वाल बाहेर पडच आहेत आणि अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर काही डॉक्टर रुग्णालयाच्या आत सर्जरी करताना दिसत आहेत.
रशियाच्या आपात्कालीन मंत्रालयाने सांगितले, आठ डॉक्टर आणि नर्सच्या एका टीमने रुग्णाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यापूर्वी दोन तास या कठीण परिस्थितीत ऑपरेशन पूर्ण केलं. रुग्णाला सोडून आपले प्राण वाचवण्यासाठी बाहेर जाण्याची पूर्ण संधी त्यांना होती. पण त्यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. रुग्णाचा फक्त जीवच वाचवला नाही तर ऑपरेशनही यशस्वीरित्या पार पाडलं.
हे रुग्णालय 100 वर्षांपूर्वी 1907 साली बांधण्यात आलं होतं. त्याचं छप्पर लाकडाचं आहे, त्यामुळे आग पेटत गेली. रुग्णालयाच्या छतावर आग लागताच 128 लोकांना तात्काळ रुग्णालयाबाहेर काढण्यात आलं. यादरम्यान कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहितीही आपात्कालीन मंत्रालयाने दिली.