या दोघांच्या लग्नाचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहा आणि रोहनप्रीत या महिन्यात 24 तारखेला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. पण या दोघांनीही अद्याप लग्नाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. नुकताच या दोघांचा त्यांच्या कुटुंबासह एक फोटोही व्हायरल झाला होता. त्या फोटोवरुन या दोघांचा रोका झाल्याचं बोललं जात आहे.View this post on Instagram
रोहनप्रीत रिऍलिटी शो 'इंडिया रायझिंग स्टार 2'चा पहिला रनरअप आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीतने एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केलं होतं.
यापूर्वी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली एकमेकांना डेट करत होते. एका म्युझिक व्हिडिओमध्ये दोघांनी एकत्र कामही केलं होतं. दोघे 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मात्र 2018 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.