मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी खायला हव्यात याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. चांगल्या आरोग्यासाठी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. त्याबद्दल जाणून (Health Care Tips) घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण आहारात विविध गोष्टींचा समावेश करत असतो. मात्र, आपल्याला कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी खायला हव्यात याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. चांगल्या आरोग्यासाठी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. त्याबद्दल जाणून (Health Care Tips) घेऊया.

रताळे

रताळी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण रताळे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. रताळ्यामध्ये टॅनिन आणि पेक्टिन्स आढळतात, त्यामुळे रताळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस्ट्रिक अॅसिडची समस्या होऊ शकते. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

मसालेदार पदार्थ

रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणे देखील टाळावे. मसाल्यांमध्ये नैसर्गिक अ‌ॅसिड असते, ज्यामुळे पोटाचे पचन बिघडते. यामुळे तुम्हाला ओटीपोटात दुखणे, जळजळ आणि पेटके येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

केळी

रिकाम्या पोटी केळी देखील खाऊ नयेत. रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन केल्याने शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणात असंतुलन होऊ शकते. यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होण्याचा धोकाही असतो.

हे वाचा - Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

सोडा

कधीही रिकाम्या पोटी सोडा खाऊ नये किंवा पिऊ नये. सोड्यामध्ये भरपूर कार्बोनेट अ‌ॅसिड असते. त्यामुळे तुम्हाला मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

टोमॅटो

टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण, रिकाम्या पोटी टोमॅटो कधीही खाऊ नये. टोमॅटोची प्रकृती अम्लीय असते, त्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

हे वाचा - Banana Benefits: थंडीच्या दिवसात रोज एक केळ खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या योग्य वेळ

लिंबूवर्गीय फळे

फळे खाणे आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे. परंतु, तुम्ही लिंबूवर्गीय फळे किंवा संत्रा, द्राक्ष आणि लिंबू यांसारख्या फळांचे रस रिकाम्या पोटी घेऊ नये. लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्रक्टोज, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट असतात. रिकाम्या पोटी ते घेतल्यास तुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips