Home /News /lifestyle /

पावसाळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, 'या' सोप्या उपायांची करा अंमलबजावणी

पावसाळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, 'या' सोप्या उपायांची करा अंमलबजावणी

ऑइली म्हणजे तेलकट (Oily Skin) त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः पावसाळ्यात या प्रकारच्या त्वचेला अधिक जपावं लागतं.

    मुंबई, 22 जून : ऋतुमानानुसार त्वचेची (Skin) काळजी घेण्याची गरज असते. जसं उन्हाळ्यात उन्हाने त्वचा काळी पडण्याचा धोका असतो, तशी हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असते. अशा कालावधीत साबण वापरण्यापासून ते क्रीमपर्यंतच्या गोष्टींत बदल केला जातो; मात्र ऑइली म्हणजे तेलकट (Oily Skin) त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः पावसाळ्यात या प्रकारच्या त्वचेला अधिक जपावं लागतं. सध्या मान्सून दाखल झाला आहे आणि तेलकट चेहरा असणाऱ्यांना काळजी लागते ती चेहऱ्यावर पुरळ उटण्यासारख्या समस्येपासून बचावाची. मग सुरू होतात क्रीमसह अन्य सौंदर्यप्रसाधनं वापरण्याचे प्रयोग; मात्र या वस्तू केमिकलयुक्त असल्याने त्वचेचं नुकसानच अधिक करतात. त्याचा वाईट प्रभावही अधिक काळ राहतो. त्यामुळे तेलकट चेहऱ्यावर घरगुती उपाय खूप उपयोगी ठरणारे आहेत. हे उपाय घरच्या घरी करता येतीलच. शिवाय तेलकट चेहरा नैसर्गिकरीत्या उजळेलं. क्लीन्झरचा वापर करा (Cleanser) चेहऱ्यासाठी योग्य क्लीन्झरचा वापर करावा. चेहऱ्यावरची धूळ, घाण, घाम आणि तेल काढून टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीला क्लीन्झर म्हणतात. हे चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यासाठी, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी वापरलं जातं. ते तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करतं आणि रक्ताभिसरणदेखील सुधारतं. कोरड्या किंवा तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यास क्लीन्झर मदत करतात. एक्सफोलिएशन करा (Exfoliation) त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वेळोवेळी एक्सफोलिएट करणं आवश्यक आहे. एक्सफोलिएशन ही तुमच्या त्वचेच्या बाहेरच्या थरातून त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. एक्सफोलिएशन त्वचेवरचा घाणीचा थर काढून त्वचा उजळ करण्यास मदत करतं आठवड्यातून दोन वेळा एक्सफोलिएशन करावं. योग्य मॉइश्चरायझरचा वापर करा (Moisturizer) मॉइश्चरायझरमुळे चेहरा हायड्रेट करण्यासास मदत होते. त्वचा मॉइश्चरायझरचा ओलावा शोषून घेते आणि दीर्घ काळ निरोगी राहते. सेलिसिलिक अ‍ॅसिड, टी ट्री ऑइल, कोरफड, हायलुरोनिक अ‍ॅसिड यांसारख्या मॉइश्चरायइरचा वापर करता येईल. लाइटवेट सनस्क्रीन कोरड्या त्वचेसाठी मान्सूनमध्येही सनस्क्रीन वापरता येईल. त्यासाठी जेलयुक्त आणि लाइटवेट सनस्क्रीन उपयुक्त ठरणारं आहे. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी बेस्ट आहेत हे 5 Food Combination; कमी करतात अ‍ॅनिमियाचा धोका हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं पावसाळ्यात शरीरातली ऊर्जा कमी होऊ लागते आणि त्यामुळे लवकर थकवा येतो. त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसतो, चेहरा अधिक तेलकट दिसतो. त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. शिवाय आहारात रसाळ फळं, भाज्यांचा समावेश करावा. ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा तेलकट चेहऱ्याला नियमित टच अप्सची आवश्यकता असते आणि ब्लॉटिंग पेपर हे काम चांगलं करतात. या कागदाच्या छोट्या पट्ट्या मेकअप खराब न करता चेहऱ्यावरचं तेल शोषून घेतात. तेलकट त्वचेसाठी ब्लॉटिंग पेपर सोबत ठेवावा.
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, Skin care

    पुढील बातम्या