मुंबई, 10 ऑगस्ट: भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) काही दिवसांवर आलाय. यंदाचा प्रजासत्ताक दिन कसा साजरा करायचा याचा विचार तुम्ही केला असेलच. परंतु दरवर्षीप्रमाणे तुम्हाला एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला प्रजासत्ताकदिनानिमित्त भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताकदिनानिमित्त शालेय मुलांना भाषण करण्यास सांगितलं जातं. मग ही लहान मुलं भाषण कसं करायचं, हे विचारायसाठी तुमच्याकडे येतात. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Republic Day speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.. प्रजासत्ताकदिनाच्या भाषणात करा ‘या’ मुद्द्यांचा समावेश –
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला.
- 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
- या दिनानिमित्त वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आपण लक्षात ठेवायला हवं.
- प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
- देशभरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा तसेच संस्थांवर ध्वजारोहन केलं जाते.
- आपलं राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे.
- भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेतली गेली आहे.
- राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य लिहिलं गेलं आहे, ज्याचा अर्थ ‘सत्याचाच विजय’ असा होतो.
- आपल्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती, त्यांची जयंती आपण 2 ऑगस्ट रोजी साजरी करतो.
स्वातंत्र्य दिनाचं भाषण लहान आणि सोपं ठेवा जेणेकरून मुलं गोंधळून जाणार नाहीत आणि त्यातील काही भाग विसरणार नाहीत किंवा मिसळणार नाहीत. वरील वाक्यांशिवाय तुम्ही आणखी माहिती शोधू शकता. एकदा का भाषण तयार झालं की त्याचा काहीवेळा सराव करून घ्या. असं केल्यानं मुलं दमदार भाषण करू शकतील.