मुंबई, 31 ऑगस्ट : रिलायन्स जिओ फायबर (Reliance Jio Fiber) युझर्ससाठी आनंदाची बातमी. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन प्लॅन आणले आहेत. यामध्ये 399 रुपयांपासून 1499 रुपयांपर्यंतच्या प्लॅनचा समावेश आहे. त्यात अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 12 ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. शिवाय नव्या ग्राहकांसाठी 30 दिवसांच्या फ्री ट्रायलचीही ऑफर देण्यात आली आहे.
रिलायन्सने आपल्या JioFiber broadband plans बदल केले आहेत. नव्या प्लॅनमध्ये 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपये प्लॅनचा समावेश आहे.
असे आहेत नवे प्लॅन
399 रुपये - 30 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल
699 रुपये - 100 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड वॉइस कॉल
999 रुपये - 150 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल, 1000 रुपयांचं 11 ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन
1499 रुपये प्लॅन - 300 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल, 1500 रुपयांच्या 12 ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन
नव्या ग्राहकांसाठी 30 दिवसांचं फ्री ट्रायल
नव्या ग्राहकांसाठी जिओ फायबरचं 30 दिवसांचं फ्री ट्रायल मिळतं आहे. यामध्ये 150 Mbps अनलिमिटेड इंटरनेट, फ्री वॉइस कॉलिंगची सुविधाही आहे. 4K सेट टॉप बॉक्सह टॉप 10 पेड ओटीटी अॅप्सचं एक्सेस कोणत्याही शुल्काशिवाय मिळणार आहे. जर ग्राहकांना सेवा आवडली नाही तर ते जिओ फायबर कंपनीला परत करू शकतात.
हे वाचा - 1 सप्टेंबरला लॉन्च होणार Samsungचा फोल्डेबल फोन, असे आहेत धमाकेदार फिचर्स
याशिवाय 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत जिओ फायबरशी जे नवे ग्राहक जोडले गेले आहेत. त्यांना MyJio मध्ये वाउचर म्हणून 30 दिवसांचे फ्री ट्रायल बेनेफिट्स मिळतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एक सप्टेंबरपासून ही सेवा मिळणार आहे.