मुंबई, 25 मुंबई : मोबाईलच्या वाढत्या ट्रेंडने खरोखरच प्रत्येकाला जग हातात घेण्याचे धैर्य दिले आहे. एका क्लिकवर तुम्ही तुमच्या प्रियजनांशी ताबडतोब कनेक्ट होऊ शकता आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्याची माहिती मिळवू शकता. पण तंत्रज्ञानाच्या चुकीच्या आणि अतिवापरामुळेही अडचणी निर्माण होतात. बरेच लोक मोबाईलला इतके महत्त्व देऊ लागतात की, त्याचा परिणाम त्यांच्या प्रियजनांवर आणि त्यांच्या नातेसंबंधांवर होऊ लागतो. स्मार्ट फोन, सोशल मीडिया सारखे व्यसन माणसाला हल्ली खूप वाईटरित्या आपल्या जाळ्यात ओढत आहे. एखादे जोडपे सोबत बसले असेल. त्यांना अगदी एकांत मिळालेला असेल. तर ते लोक एकमेकांशी गप्पा मरण किंवा चांगला वेळ घालवणं सोडून आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतात. दोघांपैकी एखादा काहींतरीओ बोलत असेल आणि दुसऱ्याचे लक्ष नसेल तर मग पुन्हा वादविवाद, गैरसमज, भांडणं या गोष्टी होऊ लागतात. अशी भांडणं, गैरसमज आणि त्यावरून एकमेकांवर दोषारोप करणे सुरू होते. त्यामुळे जोडप्यामधील परस्परांतले प्रेम संपू लागते. सध्याच्या भाषेत याला ‘फबिंग’ असे म्हटले जाते. असे सध्या मोठ्या प्रमाणावर घडते आहे. लोकमत या वृत्तपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, फबिंग’ हा शब्द पहिल्यांदा २०१२ मध्ये वापरला गेला. हल्ली लोक फोनमुळे आपल्या जोडीदाराकडे, मुलांकडे, मित्रांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. कुणी काही बोलत किंवा सांगत असेल तरीही त्याच्याकडे लक्ष ना देता लोक आपला मोबाईल स्क्रोल करत राहतात. या ‘फबिंग’ मुळे वैयक्तिक नातेसंबंध आणि महत्वाचे म्हणजे माणसाचे मानसिक आरोग्य बिघडायला लागले आहे. आपल्या सभोवतालही माणसं हल्ली बऱ्याचदा जगाचा विसर पडल्यासारखी वागतात आणि कायम फोनला चिकटलेली असतात. ‘कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनामध्ये पार्टनर फोन फबिंगचा व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 48 टक्के लोक सांगतात की, फोनमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला तर 36 टक्के लोक म्हणाले, फबिंगमुळे त्यांचं सतत भांडण होत असतं. सवय मोडण्यासाठी आजच उचला ही पावलं घरातील कोणतीही व्यक्ती किंवा तुमचा जोडीदार तुमच्याशी बोल्ट असेल तर आधी हातातला फोन खाली ठेवा आणि त्यांचं म्हणणं ऐका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला काहीतरी सांगायचे असेल आणि त्यांच्या हातात फोन असेल तर त्या परिस्थितीत चिडणे किंवा वाद टाळा आणि त्यांना शांतपणे मोबाईल खाली ठेवण्यास सांगा. स्वतःदेखील कामाव्यतिरिक्त जास्त मोबाईलचा वापर करू नका आणि घरातील इतर सदस्यांनाही हे पटवून द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.