जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Relationship : आईच्या दुसऱ्या लग्नानंतर तिच्यासोबतच्या नात्यात दुरावा आलाय, हे नातं पूर्वीप्रमाणे कसं होईल?

Relationship : आईच्या दुसऱ्या लग्नानंतर तिच्यासोबतच्या नात्यात दुरावा आलाय, हे नातं पूर्वीप्रमाणे कसं होईल?

कधीकधी आई आणि मुलीच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा येतो. तेव्हा हे नातं टिकवणं आई आणि मुलगी दोघींची जबादारी असते.

कधीकधी आई आणि मुलीच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा येतो. तेव्हा हे नातं टिकवणं आई आणि मुलगी दोघींची जबादारी असते.

आई आणि मुलगी यांच्यातील नाते आनंद, प्रेरणा आणि बिनशर्त प्रेमाचे स्त्रोत असते. मात्र कधीकधी आई आणि मुलीच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 मे : आई ही मुलीची पहिली आदर्श आणि मार्गदर्शक असते. आईचा मुलीच्या विकासावर आणि आत्मसन्मानावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. मुली जसजशा वाढतात आणि अधिक स्वतंत्र होतात. आई आणि मुलगी यांच्यातील नाते आनंद, प्रेरणा आणि बिनशर्त प्रेमाचे स्त्रोत असते. मात्र कधीकधी आई आणि मुलीच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा येतो. तेव्हा हे नातं टिकवणं आई आणि मुलगी दोघींची जबादारी असते. बऱ्याचदा वयाच्या एखाद्या टप्प्यावर आई एकटी पडते. काहीवेळा आई वडील वेगळे होतात तर काहीवेळा वडिलांच्या जाण्यामुळे आई एकटी पडते. अशावेळी आईने एखादा जोडीदार निवडला तर त्याचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. आपली आई म्हणून आपला तिच्यावर सर्वांपेक्षा जास्त अधिकार असतो. असे आपल्याला वाटते. काही अंशी ते खरेही असते, कारण आईनेच आपल्याला तो हक्क दिलेला असतो. मात्र तरीदेखील आई ही एक स्वतंत्र्य व्यक्तीदेखील असते. आपण पूर्णकाळ आईसोबत राहू शकत नाही. तेव्हा आईलाही एखाद्या जोडीदाराची गरज भासू शकते. काहीवेळा आई हे बोलून दाखवते तर काहीवेळा तिला हे बोलता येत नाही. मात्र आईने एखादा जोडीदार निवडला, तिने दुसरं लग्न केलं तर ते चुकीचं असत का? आईच्या दुसऱ्या लग्नानंतर तिच्यासोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. पण संपवणं आपल्या हातात असतं. कारण आई कुठेही असली, कशीही असली. तरी ती कायम आपल्या मुलांच्या सोबत असते, त्यांच्यावर नितांत प्रेम करत असते. आईसोबतचा दुरावा असा करा दूर.. आईच्या समस्या समजून घ्या : बाबाच्या जाण्यानंतर आई एकटी असेल तर साहजिकच तिला एकटेपणा जाणवत असणार किंवा काही कारणास्तव आई बाबा वेगळे झाले असतील तरीही आईला तिच्या आनंदाचा विचार करण्याचा हक्क असतो. मूल म्हणून काहीवेळा आईच्या दुसऱ्या लग्नाचा विषय आपल्याला चुकीचा वाटू शकतो. पण आईचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार केल्यास तुम्हाला आईचे दुसरे लग्न स्वीकारणे सोपे जाईल. आईशी स्पष्टपणे बोला : कोणत्याही नात्यातील समस्या सोडवण्यासाठी संवाद हा उत्तम उपाय असतो. आईच्या दुसऱ्या लग्नानंतर तुम्हाला काही गोष्टी खटकत असतील किंवा आवडत नसतील तर त्या आईला सांगा. दोघींनी योग्य संवाद साधल्यास तुम्ही समस्याच सहज सोडवू शकता. आईसाठी वेळ काढा : आपल्या रोजच्या आयुष्यातून आईसाठी थोडा वेळ काढा. रोज आईला एकतरी फोन करा किंवा आठवड्यातून एकदा भेटायला जा. यामुळे आईच्या दुसऱ्या लग्नानंतरही तुमच्यामध्ये दुरावा येणार नाही. आईने दुसरं लग्न केलं तरी ती कायम आपली आईच असते. त्यामुळे कशीही परिस्थिती असली तरी आपणही कायम आईचं मूल होऊनच राहिलं पाहिजे. नवे नाते, नातेवाईक स्वीकारण्याचा प्रयत्न करा : आई आयुष्यभर अविरत आपल्या आनंदासाठी खूप काही करत असते. त्यामुळे आईच्या आनंदासाठी आपणही काहीतरी करणं आवश्यक असत. म्हणून आईची साथ द्या. आईने जोडलेली नवी नाती, नातेवाईक मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आईच्या आनंदात तुम्ही सामील झालात तर आईचा आनंद द्विगुणित होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात