प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 12 फेब्रुवारी: आपला व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय ठरावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीची आवड निवड जपणं, त्याला त्यादिवशी स्पेशल काहीतरी खाऊ घालणं, अशा ट्रिक्स वापरल्या जातात. 14 फेब्रुवारीला अहमदनगरमधील कुणी बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला असेल. तर त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन स्पेशल डिश उपलब्ध आहे. डिशचं नावही हीर-रांझा मसाला आणि लैला-मंजनू डिश असं भन्नाट आहे.
हीर-रांझा मसाला अहमदनगरमधील मंजिरी ताकते यांनी व्हॅलेंटाईनसाठी खास डिश बनवल्या आहेत. उच्च शिक्षित असणाऱ्या ताकते या नगर - पुणे बायपास रस्त्यावर हॉटेल चालवतात. तिथे त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी हीर - रांझा मसाला ही डिश बनवली आहे. हार्ट शेप मधील दोन हेल्थी कटलेट आणि सोबत ग्रीन ग्रेव्ही मिळते. ती मसाला रोटी सोबत सर्व्ह करता येते. ही डिश तुम्ही कँडल डिनर करु शकता.
काळ्या मसाल्याचे ‘सम्राट’, 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Videoकशी बनते डिश
हार्ट शेपचे हे कटलेट रेड कलर आणि ग्रीन कलर मध्ये बनवले जाते. मिक्स व्हेजिटेबल आणि पनीर चीज पासून ते बनवले आहे. हे सर्व एकदम बारीक करून छान मळून घेतले जाते. त्यानंतर छान हार्ट शेप देऊन गरमागरम तेलात तळून काढले जाते. छान क्रीस्पी झाल्यानंतर ग्रीन ग्रेव्हीची तयारी केली जाते. आलं लसूण पेस्ट, ग्रीन चटणी, चिरलेला कांदा, सिमला मिरची, लसूण, किसलेले चीज, पनीर, खवा, क्रीम बटर घरगुती मसाले वापरून ग्रीन मसाला बनवला जातो. त्यामुळे कटलेट आणि मसाला ही डिश खाण्यासाठी एकदम हटके लागते. रोटी व राइस तुम्ही खाऊ शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीला या डिश देऊन तुमचा दिवस स्पेशल करू शकता.