मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /संक्रांतीला बनवा पराठ्यासारखे दिसणारे गोड आणि तिखट वडे, पाहा Recipe Video

संक्रांतीला बनवा पराठ्यासारखे दिसणारे गोड आणि तिखट वडे, पाहा Recipe Video

X
Makar

Makar Sankranti 2023 आपल्या राज्यातील खाद्य संस्कृतीचा भाग असलेला हा पदार्थ मकर संक्रातीला नंदुरबार जिल्ह्यात घरोघरी केला जातो.

Makar Sankranti 2023 आपल्या राज्यातील खाद्य संस्कृतीचा भाग असलेला हा पदार्थ मकर संक्रातीला नंदुरबार जिल्ह्यात घरोघरी केला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 11 जानेवारी : भारतीय संस्कृती ही जगातील सगळ्यात श्रीमंत अशी खाद्य संस्कृती आहे. प्रदेशानुसार जेवण्याची पद्धत आणि चव दोन्ही बदलतात.  आपल्या राज्यातील खाद्य संस्कृतीचा भाग असलेला पण, सर्वांना माहिती नसलेल्या एका पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा पदार्थ मकर संक्रातीला नंदुरबार जिल्ह्यात घरोघरी बनवला जातो. गोड वडे तिखट वडे असं या पदार्थाचं नाव असून नीलिमा पाटील यांनी या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. वडे म्हटले म्हणजे तुम्हाला वाटलं असेल तळलेल्या वड्यांचा प्रकार मात्र ते असे नसून पराठ्यासारखे बनवले जातात.

    गोड वड्यांचे साहित्य

    1)गहू - एक वाटी

    2)गुळ- अर्धी वाटी

    3)वेलची, जायफळ पूड आवडीनुसार

    4)खवलेले खोबरे

    5)मीठ चवीनुसार

    6) बारीक कापडाने गाळलेले गव्हाचे पीठ

    7)तेल

    दुधी भोपळ्यापासून अगदी सोप्या पद्धतीनं बनवा ढोकणे, पाहा Recipe Video

     गोड वडे कसे करणार?

    एका कढईत मंद आचेवर गहू गुलाबी भाजावे. थंड झाल्यावर बारीक रवाळ पीठ दळून घ्यावे आणि गाळणीने गाळून घ्यावे. एका पातेलीत पाणी तापवत ठेवून त्यात वेलची, जायफळ पूड आणि गूळ घालावा. गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळून ते पाणी उकळल्यावर गाळून घ्यावे. गाळलेले पाणी पुन्हा गॅसवर ठेवून तयार केलेले पीठ घेरून घ्यावे. गॅस बंद करून झाकून ठेवावे.

    हे सारण थंड झाल्यावर त्यात खोबरे घालून मिश्रण एकजीव करून पुरणपोळीप्रमाणे गोळे करून घ्यावे चिमूटभर मीठ आणि तेलाचे मोहन टाकून कणीक मऊसर मळून घ्यावी. कणकेचा गोळा आणि सारण घेऊन पुरणपोळीप्रमाणे लाटून शेकून घ्यावे. शेकताना पराठ्याप्रमाणे त्या वड्याच्या दोघ बाजूंना तेल सोडून मंद आचेवर भाजावे

    तिखट वडे करण्याचं साहित्य

    1)उडीद डाळ एक वाटी

    2)चणाडाळ अर्धी वाटी

    3)मेथी दाणे अर्धा चमचा

    4)लसूण जिरे पेस्ट दोन चमचे

    5) तिखट ,धने पावडर आवडीनुसार

    6)मीठ चवीनुसार

    7)बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी

    8)बारीक कापडाने गाळलेलं गव्हाचं पीठ

    9) तेल

    तिखट वडे कसे करणार?

    सर्वप्रथम एका कढईत उडीद डाळ चणाडाळ आणि मेथी दाणे मंद आचेवर वेगवेगळे लालसर भाजून घ्यावे. छान लालसर भाजलेले हे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक रवाळ दळून घ्यावे. आणि हे पीठ एकजीव करावे. नंतर एका पातेलीत पाणी उकळत ठेवावे .त्यात लसूण जिरे पेस्ट ,मीठ व तिखट, धनेपूड घालून एक चमचा तेल टाकावे. पाणी उकळल्यावर त्यात तयार केलेले पीठ घालून ते मंद आचेवर घेरून घ्यावे आणि दोन ते तीन मिनिटे गँस बंद करून झाकून ठेवावे. घेरलेले पीठ थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर टाकावी आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे.

    Makar Sankranti 2023 Ukhane in Marathi : पहिल्या संक्रांतीची तयारी खास, हे उखाणे घ्या आणि व्हा स्मार्ट सून

    या मिश्रणाचे पुरणाच्या गोळ्या सारखे गोळे बनवून ठेवावे. थोडेसे मीठ आणि तेलाचे मोहन टाकून गव्हाच्या पिठाची कणीक मऊसर मळावी व पुरणाची पोळी लाटतो त्याचप्रमाणे लाटून पराठ्यांप्रमाणे दोघे बाजूंना तेल सोडून भाजावे. अशा प्रकारे हे तिखट वडे बनवले जातात आणि ते तांदळाच्या खीर सोबत सर्व्ह केले जातात. या खमंग खीर वड्यांचा मकरसंक्रातीच्या दिवशी नैवेद्य देखील दाखवला जातो.

    First published:

    Tags: Local18, Local18 food, Makar Sankranti 2023, Mumbai, Nandurbar