मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दुधी भोपळ्यापासून अगदी सोप्या पद्धतीनं बनवा ढोकणे, पाहा Recipe Video

दुधी भोपळ्यापासून अगदी सोप्या पद्धतीनं बनवा ढोकणे, पाहा Recipe Video

X
खान्देशातील

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात ढोकणे हा खाद्य पदार्थ प्रसिद्ध आहे. दुधी भोपळ्यापासून ढोकणे कसे बनवायचे जाणून घ्या.

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात ढोकणे हा खाद्य पदार्थ प्रसिद्ध आहे. दुधी भोपळ्यापासून ढोकणे कसे बनवायचे जाणून घ्या.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nandurbar, India

  नंदुरबार, 06 जानेवारी : दुधी भोपळ्याची भाजी आणि पराठे आपण खाल्लेच असतील. पण त्यापासून ढोकणे (मुठकुळे) सुद्धा बनवले जातात. खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात ढोकणे हा खाद्य पदार्थ प्रसिद्ध आहे. दुधी भोपळा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो. दुधी भोपळ्या पासून बनवले जाणारे ढोकणे हे पचनाला हलके असतात आणि चवीलाही उत्तम असतात. ढोकणे आरोग्यासाठी अतिशय ऊत्तम असतात. याच दुधी भोपळ्यापासून ढोकणे कसे बनवायचे याची रेसिपी निलिमा पाटील यांनी सांगितली आहे.

  साहित्य

  1) गुलाबी भाजलेल्या गव्हाचे करकरीत पिठ (दुधीच्या ओलाव्यात मावेल एवढे)

  2) एक दुधी

  3) लसणाच्या पाकळ्या

  4) हिरवी मिरची दोन ते तीन

  4) मीठ

  5) तेल

  4) लाल तिखट

  5) बारीक चिरलेली कोथिंबीर

  6) जीरे

  7) हळद

  8) तेल

  9) बेरा किंवा मोहरी

  10) टोमॅटो प्युरी

  11) हिंग

  कृती

  गहू भाजून दळलेले रवाळ पीठ घेऊन त्यात मोहन घालणे. तसेच दुधीची साल काढून त्याचे किस करून घेणे. त्या किस मध्ये मावेल एवढेच ते रवाळ पीठ घेणे. त्यात मीठ, जिरे, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, टोमॅटोची प्युरी, कोथिंबीर, हिंग हळद, लाल तिखट हे सर्व पदार्थ टाकून त्यांना एकजीव करून त्या सारणाचा गोळा तयार करणे. त्याला पाच मिनिटे झाकून ठेवणे. नंतर त्या कणकेच्या सारणाचे मुठे वाळणे व हे सर्व मुठे उकळत्या पाण्यावर चाळणीत ठेवून वाफवून घेणे. 15 ते 20 मिनिटे हे मुठे वाफवणे.

  खान्देशातील अस्सल झणझणीत मसाला खिचडी कशी तयार करणार? पाहा Recipe Video

  शिजून झाल्यावर त्यांना चाळणीतून बाहेर काढून पसरट भांड्यात टाकने. वाफ निघाल्यानंतर त्याचे सुरीने तुकडे करणे. नंतर कढई गॅसवर ठेवून त्यात फोडणीसाठी तेल टाकणे. तेल तापले की त्यात बेरा, तीळ, कापलेली हिरवी मिरची टाकून चांगले फ्राय करणे. नंतर त्यात आपण कापलेले ढोकणे टाकने व हलवणे. वरून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकने. अशा प्रकारे ढोकणे तयार केले जातात. त्यांना दह्यापासून किंवा ताकापासून बणविलेल्या कढी सोबत खाल्ले जातात. हे ढोकणे आरोग्यासाठी अतिशय ऊत्तम, खाण्यासाठी चविष्ट असतात. पचनासाठी हलके असतात.

  First published:

  Tags: Local18, Local18 food, Nandurbar