जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीनं अगदी झटपट बनवा उकडीचे मोदक, पाहा VIDEO

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीनं अगदी झटपट बनवा उकडीचे मोदक, पाहा VIDEO

अगदी सोप्या पद्धतीनं उकडीचे मोदक तयार करता येतात.

अगदी सोप्या पद्धतीनं उकडीचे मोदक तयार करता येतात.

How to make Ukdiche Modak: गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच उकडीचे मोदक खाण्याचे वेध अनेकांना लागतात. हे मोदक तयार करण्याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 30 ऑगस्ट : गणपती बाप्पाचे आगमन (Ganesh Chaturthi 2022) आता काही तासांवर आले आहे. सर्वच घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने विघ्न दूर होतील आणि मंगलवर्ता कानी पडतील अशी भाविकांची श्रद्धा असते. त्यामुळे या स्वागतासाठी कोणतीही उणीव राहू नये म्हणून सर्व जण प्रयत्न करतात. गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक देण्याची प्रथा आहे. काही घरांमध्ये तळणीचे तर काही घरांमध्ये उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दिला जातो. यापैकी उकडीचे मोदक (How to make Ukdiche Modak) कसे करायचे याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रतीक गाडगीळ यांनी ही सोपी पद्धत सांगितली आहे. सारणासाठी साहित्य खोवलेले ओले खोबरे (1 वाटी) खिसलेला गूळ (पाऊण वाटी) आवडी नुसार जायफळ, इतर ड्रायफ्रूड सारण कसे बनवायचे? पाहिल्यांदा कढईत गूळ आणि खोबरे थोडं तूप टाकून परतून घ्यावे. या सारणाला पाणी सुटेल या पाण्यात हे सारण शिजेल. थोडं ओलसरच सारण करावे. सारण तयार झाले की ते थंड करायला बाजूला ठेवावे. आता उकड तयार करा उकडीसाठी 1 किलो तांदळाचे पीठ  घ्यावे. यामध्ये 250 ग्राम बासमती तांदूळ आणि 750 ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घ्यावे. जेवढे मोदक करायचे आहेत त्या प्रमाणात पीठ घ्यावे. वाजतगाजत महागणपतीचे आगमन : गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पाहा Photos उकडीचे साहित्य एक वाटी तांदळाचे पीठ चवीपुरते मीठ एक वाटी पाणी भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाण्याला एक उकळी फुटली की त्यात पीठ टाकून मंद आचेवर पीठ एकजीव करावे आणि त्याला एक वाफ येण्यासाठी 2 मिनिट झाकून ठेवावे. वाफ आली की ही उकड परातीत काढून गरम गरम मळावी. थंड उडकीचे पीठ मळता येत नाही. थोडं पाणी तेल लावून ही उकड मळून घ्यावी आणि झाकून ठेवावी. तर, दुसरीकडे मोदक उकडण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यसाठी ठेवावे. आणि एक पांढरे फडके ओले करुन चाळणीत अंथरावे. कशी करावी मोदकांची पारी? आपल्याला हव्या त्या आकाराचे पिठाचे गोळे करून घ्यावे आणि ते हलक्या हाते पारी करावी.पारी करताना थोडं तेल पाण्याच्या हाताने ती करावी. तीन बोटाच्या चिमटीत पकडून पारीला कळ्या पाडाव्यात. पारी थोडी तुटली तरी ती नीट करता येऊ शकते. Ganesh Chaturthi: यंदा नातेवाईकांसोबत करा गणरायाचं स्वागत; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा ‘या’ सुंदर निमंत्रण पत्रिका सगळ्या कळ्या जवळ जवळ असाव्यात. शेवटी त्या पारीमध्ये थंड केलेले सारण भरावे आणि सगळ्या कळ्या हलक्या हाताने जुळवून घ्याव्यात. हा बनलेला मोदक थोडा पाण्यातून काढून मग आपल्या उकडण्यासाठी ठेवलेल्या चाळणीत ठेवावा. मोजून 12 मिनीटांनी मोदक उकडून तयार होतो. थोडा थंड झाला की हा मोदक साजूक तुपाबरोबर खा! अधिक माहितीसाठी संपर्क साधा -  प्रतीक गाडगीळ, मोबाईल नंबर  8698767053

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात