जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diet करत होता शेन वॉर्न, वजन कमी करताना तुम्हीही घ्या ही काळजी!

Diet करत होता शेन वॉर्न, वजन कमी करताना तुम्हीही घ्या ही काळजी!

Diet करत होता शेन वॉर्न, वजन कमी करताना तुम्हीही घ्या ही काळजी!

बदलती जीवनशैली, ताण-तणाव, चुकीच्या पद्धतीनं घेतला जाणारा आहार आणि लठ्ठपणा या गोष्टी अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. त्यामुळे अनेक लोक आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम आणि डाएटवर (Diet) भर देतात. महान क्रिकेटपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याचं वयाच्या 52 व्या वर्षी 4 मार्च 2022 रोजी निधन झालं.

    मुंबई, 7 मार्च : बदलती जीवनशैली, ताण-तणाव, चुकीच्या पद्धतीनं घेतला जाणारा आहार आणि लठ्ठपणा या गोष्टी अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. त्यामुळे अनेक लोक आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम आणि डाएटवर (Diet) भर देतात. महान क्रिकेटपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याचं वयाच्या 52 व्या वर्षी 4 मार्च 2022 रोजी निधन झालं. हार्ट अ‍ॅटॅकमुळे वॉर्नचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यासोबत आणखी काही कारणांचीही चर्चा आहे. परंतु, शेन वॉर्नच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, तो वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस डाएट करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे डाएटचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शेन वॉर्नचा मृत्यू डाएटनं झाल्याचा दावा करण्यात येत नसला तरी तुम्ही मात्र डाएट करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. चुकीच्या डाएटमुळे फिटनेसऐवजी (Fitness) आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जागतिक कीर्तीचा लेग स्पिनर शेन वॉर्न याचं नुकतंच निधन झालं. शेन वॉर्नच्या मृत्यूच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. शेन वॉर्न अतिप्रमाणात मद्यपान करत होता, तसेच तो ड्रग्ज (Drugs) सेवनही करत असे असं काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे. पण शेन वॉर्नच्या मॅनेजरने या सर्व गोष्टी चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे. जेम्स एर्स्किन यांनी सांगितलं की, ``शेन वॉर्न मद्यपान किंवा ड्रग्ज सेवन करत नव्हता. काही वर्षांपूर्वी मी त्याला वाईनची कॅरेट दिली होती. पण आज 10 वर्षानंतर ती तशीच आहे. शेन मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी थायलंडला गेला होता. फिटनेस आणि वजन कमी करण्यासाठी तो डाएट करत होता.`` या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा नसला तरी डाएट करताना काही गोष्टींची निश्चितच काळजी घेतली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी 30 वर्षांच्या लेक्सी रीड या महिलेनं तिचं 141 किलो वजन (Weight) कमी केलं होतं. परंतु, काही दिवसांत तिची प्रकृती बिघडली. तिला `आयसीयू`मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. कारण तिच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. त्यामुळे असे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं डाएट आणि वजन कमी करणं गरजेचं आहे. तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर, ते जलद कमी व्हावं यासाठी, मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा (Maintenance calories) केवळ 200 ते 300 कॅलरीज कमी खा. जर तुम्ही मेंटेनन्स कॅलरीपेक्षा कमी खाल्लं तर ते तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतं. कमी कॅलरी घेतल्यानंतर शरीराला पुरेसा आराम मिळेल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्ही पुरेशी विश्रांती (Rest) घेतली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवेल. वेट लॉस डाएट करताना पुरेशा प्रमाणात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश आहारात करा. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन, खनिजं आणि अ‍ॅंटिऑक्सिडंट पुरेशा प्रमाणात मिळेल. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटसचा (Complex carbohydrates) उत्तम स्त्रोत असलेले भात, ब्राउन ब्रेड, ओट्स यांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला पुरेशी एनर्जी मिळेल. डाएट फॉलो करताना पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. त्यासोबतच प्रोटिन, हेल्दी फॅट आणि कार्बयुक्त पदार्थांचं सेवनही गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याविना किंवा चुकीच्या पद्धतीनं डाएट केलं तर अनेक शारिरीक समस्या निर्माण होऊ शकतात. काही अहवालांच्या दाव्यानुसार, डाएटिंगमुळे तुमच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. डाएटमुळे स्नायूंची (Muscle) क्षमता कमी होते. केसगळती होते. डिहायड्रेशन होऊ शकतं तसेच हार्ट रेटही (Heart Rate) कमी होण्याची शक्यता असते. डाएट दरम्यान शरीरात काही कालावधीकरिता शरीरात काही व्हिटॅमिन (Vitamins) आणि मिनरल्सचं (Minerals) प्रमाण कमी होऊ शकतं. कमी कॅलरीमुळे असं होऊ शकतं. काही लोकांना डाएट दरम्यान कमी खाल्ल्यानं भूक लागते. भूक नियंत्रणात ठेवत न खाल्ल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे गॅसचा त्रास वाढून चक्कर येऊ शकते. जे लोक पूर्वी भरपूर खात होते आणि आता डाएटमुळं खाण्याचं प्रमाण कमी केलं आहे, अशा वेळी शरीर योग्य प्रतिसाद देत नाही. शरीर एनर्जी वाचवण्यास सुरुवात करते. यामुळे थकवा, सुस्ती येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. काही अहवालांच्या दाव्यानुसार, जोपर्यंत शरीराला पुरेशा प्रमाणात अन्नपदार्थ मिळत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं. याचा परिणाम तुमच्या मेंटल हेल्थवर (Mental Health) होऊ शकतो. ज्या महिला डाएट करतात, त्यांना पिरियड्समध्ये अनियमितता जाणवू शकते. त्यामुळे डाएट करताना, पुरेशी काळजी, वेळेचं पालन, योग्य आहार आणि तज्ज्ञांचा सल्ला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कमी खाल्ल्यानं नव्हे तर चांगलं खाल्ल्यानं वजन कमी होतं. यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि मेंटेनेंस कॅलरीपेक्षा थोडं कमी खाणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात