राशीभविष्य: आज कोणाचे स्टार चमकणार तर कोणाला बसेल फटका?

राशीभविष्य: आज कोणाचे स्टार चमकणार तर कोणाला बसेल फटका?

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मेष- महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब नको. कामाचा आळस जाणवेल. शत्रूंपासून सावध राहा. कोणतेही मोठे निर्णय घेण्याआधी मोठ्यांचा सल्ला घ्या.

वृषभ- थकवा जाणवेल. सकारात्मक विचारांनी केलेलं काम यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. कुटुंबातील समस्या तणाव कमी होतील. वाद होणार नाहीत याची मात्र काळजी घ्या.नोकरदार आणि व्यवसायिकांनी सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं.

मिथुन- नव्य़ा संधी मिळतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रियजनांच्या भेटी होतील. महत्त्वाकांशा पूर्ण होतील.

कर्क- भावनांवर नियंत्रण ठेवणं फायद्याचं ठरेल. कला, शिक्षण क्षेत्रात कलागुणांना वाव मिळेल. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हिताचं ठरेल. शाब्दिक वाद न करणं इष्ट ठरेल. त्यामुळे येणाऱ्या अडचणी टळतील.

सिंह- मोठी संधी मिळण्याची शक्यता. प्रेम प्रकरण आणि कौटुंबीक वातावरण चांगलं राहिल. प्रियजनांच्या प्रेमामुळे दिवस आनंदी जाईल. वस्तू विसरण्याचा धोका आहे. नकारात्मक लोकांपासून दूर राहाणं हिताचं ठरेल.

कन्या- लग्नासाठी प्रस्ताव येणाचा योग आहे. आजचे अनुभव तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवणारे असतील. वाद मिटतील. गुंतवणूक, व्यवसायिकांनी पैशांबाबत अधिक जागृक रहावं. अर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ- पगार वाढ किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता. जादा मेहनत करावी लागेल. विद्यार्थी, नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी आजचा दिवस कष्टाचा आहे. प्रेम प्रकरण आणि कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहिल.

वृश्चिक- नव्या संधी मिळतील त्याचं सोनं करा. प्रवास घडेल. वैवाहिक जीवनात सुखवार्ता मिळेल. नोकरदार, विद्यार्थी आणि व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनु- जुने आजार पुन्हा डोकं वर काढू शकतात त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम प्रकरणात आणि वैवाहिक जीवनात चांगले बदल घडतील. कोणत्याही गोष्टीला हो म्हणण्याआधी भविष्यातील परिणामांचा विचार करा. आर्थिक स्थिती चांगली राहिल मात्र खर्च वाढतील.

मकर- आजचा दिवस शुभ आहे. प्रगतीची दारं आपल्यासाठी खुली होतील. प्रॉपर्टी प्रकरण, नवा व्यवसाय, जमिनीच्या प्रकरणांमध्ये चांगला फायदा मिळेल. पैशांची चणचण जाणवेल.

कुंभ- प्रयत्नशील रहा. आता अपयश आलं तरी खचू नका कारण पुढे त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. प्रेम प्रकरण आणि कुटुंबातील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. पैशांची बचत करा.

मीन- महत्त्वाच्या निर्णयामध्ये ज्येष्ठांचा सल्ला घ्या. खर्चावर निर्बंध ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरदार आणि व्यवसायिकांचा सबुरीनं घ्यावं लागेल.

(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)

First published: January 20, 2020, 7:09 AM IST

ताज्या बातम्या