राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या लोकांना आज होणार आर्थिक फायदा

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या लोकांना आज होणार आर्थिक फायदा

कोणाला मिळणार शुभ वार्ता कोणाचे स्टार्स चमकणार? जाणून घ्या आजच राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. आपल्या ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आपला दिवस कसा जाणार याची कल्पना आपल्याला असेल तर काही खबरदारी घेऊन येणाऱ्या समस्या टाळता येतात किंवा त्यावर तोडगा काढता येतो. त्यासाठी जाणून घ्या आज 12 राशींसाठी कसा असेल दिवस.

मेष - नवीन प्रकल्प, योजनांमधून पैसे कमवू शकता. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवल्य़ानं आनंद मिळेल. कुटुंबातील मतभेदांमुळे तणावाला सामोरं जावं लागेल.

वृषभ- अचानक आलेल्या नफ्यामुळे आपला आनंद द्विगुणीत होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी आज आपली हुकुमत असेल. महत्त्वाचे निर्णय किंवा योजना करत असाल तर थांबा आज करू नका.

मिथुन - अस्वस्थतेची भावना त्रासदायक असेल. सकारात्मक विचार करणं उपयुक्त ठरेल. आर्थिक लाभ होईल. मेहनतीचं कौतुक होईल मात्र फळ मिळण्यास वेळ जाईल. बोलून प्रश्न मार्गी लागतील न बोलल्यानं समस्या आणखी गुंतागुंतीची होईल. आपल्या संयमाचा कस लागेल. धैर्य गमावू नका. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क - आज विश्रांती घेणं आवश्यक आहे. मानसिक ताण असल्यानं थकवा जाणवेल. पारंपरिक पद्धतीनं गुंतवणूक फायद्याची ठरेल. प्रेम प्रकरणांमध्ये विशेष काळजी घ्या. प्रलंबित असलेल्या गोष्टी मार्गी लागतील.

सिंह - गर्भवती महिलांनी आज अतिरिक्त काळजी घेणं आवश्यक आहे. आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाचे काम मध्यभागी अडकेल. सकारात्मक गोष्टींवर विचार करण्यात काहीही चूक नाही. कलात्मक आणि सर्जनशील क्षमतेचं खूप कौतुक होईल.

कन्या - चांगल्या आयुष्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हट्टीपणाने वागू नका. खोटं बोलल्यामुळे आपल्या प्रेमात दुरावा येऊ शकतो.

तुळ - अनुभवी लोकांच्या सल्ल्यानं गुंतवणूक केल्याचा मोठा फायदा होईल. रेम प्रकरणांबद्दल जास्त बोलू नका. आजचा दिवस आपल्या संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो.

वृश्चिक - इतरांचे म्हणणे ऐकून गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. चांगलं नातं टिकवण्यासाठी विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. प्रिय व्यक्तीस आनंदी ठेवणं आपल्यासाठी खूप अवघड आहे. कामाच्या ठिकाणी टीका होऊ शकते.

धनु - तुम्हाला जमीन, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक जीवनात काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. भविष्यात, आपले शत्रूही आज आपले मित्र होतील.

मकर - यशाच्या नव्या संधी मिळतील. आर्थिक योजनांपेक्षा जास्त खर्च करणे टाळावे. ही वेळ समजून घेण्याची आहे. घाईनं निर्णय घेणं टाळा. राग हा निव्वळ वेडेपणा आहे. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींचं मोठं नुकसान होऊ शकतं. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - आपल्या स्वभावामुळे आपण प्रिय व्यक्तीला गमवणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबात आपल्या निर्णयामुळे ताण निर्माण होऊ शकतो. आपल्याला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. प्रवासाच्या संधी दवडू नका त्यातून फायदा मिळेल.

मीन- फक्त नशीबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा. आजच्या गुंतवणुकीमुळे आपली भरभराट होईल आणि आर्थिक सुरक्षा वाढेल. संयमाने परिस्थितीचा सामना केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

First published: March 7, 2020, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading