राशीभविष्य : मिथुन आणि मकर राशीच्या लोकांना प्रेमात करावा लागेल अडचणींचा सामना

राशीभविष्य : मिथुन आणि मकर राशीच्या लोकांना प्रेमात करावा लागेल अडचणींचा सामना

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या ग्रहावर होत असतो. येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागली तर त्यांचा सामना करणं आधीक सोपं होतं त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 30 एप्रिलचा आजचा दिवस.

मेष- स्वत:ला उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस कठीण असेल.

वृषभ- आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कामाच्या आघाडीवर हा एक कठीण दिवस असू शकतो.

मिथुन- प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी आपलं कार्य करत राहा. प्रिय व्यक्तीपासून जास्तकाळ दूर राहाणं आपल्यासाठी कठीण जाईल. बऱ्याच गोष्टी आज आपल्या संयमाची परीक्षा घेतील. वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

कर्क- कठीण परिस्थित अडकल्यास घाबरू नका. खर्चावर नियंत्रण घातलं नाही तर भविष्यात आर्थिक संकट ओढवेल. विनाकारण जोखीम पत्करणं आज टाळा.

सिंह - आज विश्रांती घेण्याची गरज आहे. उशिरापर्यंत काम कऱणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. सृजनशील व्यक्तींसाठी आजचा दिवस यशाच्या मार्गावर नेणारा आहे.

कन्या- मानसिक शांततेचा भंग होऊ नये म्हणून आपलं मन छंद जोपासण्यात घालवा. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

तुळ- खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. आपल्याला आवडणाऱ्या आणि आपली काळजी घेणार्‍या लोकांसह थोडा वेळ घालवा.

वृश्चिक- आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी उत्तरं नीट न दिल्यास मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.

धनु- विनाकारण ताण घेणं टाळा. एकतर्फी प्रेम करण्यात वेळ वाया घालवू नका. आज अडचणींचा सामना करण्याची तयारी ठेवा.

मकर- आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. प्रेम प्रकरणात आजचा दिवस अधिक गुंतागुंतीचा असेल.

कुंभ- सगळ्या समस्यांवर तुमचं हसणं हा रामबाण उपाय असू शकतो त्यामुळे हसत राहा. आपल्या प्रेमासोबत वेळ घालवला तर दिवस चांगला जाईल.

मीन- भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भीतीवर नियंत्रण मिळवलं नाही तर त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी फार फायदेशीर नाही.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 30, 2020, 8:18 AM IST

ताज्या बातम्या