वॉशिंग्टन, 08 जानेवारी : सध्या कोरोनाव्हायरस आणि त्याचे डेल्टा, ओमिक्रॉन असे व्हेरिएंट थैमान घालत आहेत. यात आता आणखी एका नव्या व्हायरसची भर पडली आहे. अमेरिकेत एक जीवघेणा व्हायरस आढळला आहे. इथं रॅबिट हेमोरेजिक डिजीस व्हायरसची 2
(RHDV2) प्रकरणं सापडली आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
रॅबिट हेमोरेजिक डिजीस व्हायरस
(Rabbit hemorrhagic disease virus 2) नावातूनच हा व्हायरस कुणाला होतो, हे तुम्हाला समजलं असेल. सशांना या व्हायरसची लागण झाली आहे
(Rabbit disease). ओरेगॉन वेटरिनरी डॉयग्नोस्टिक लेबोरेटरीने याची पुष्टी केली आहे. क्रूक काऊंटीतील पावेल बुटेत काळ्या शेपटीच्या जॅकरॅबिट (Jackrabbit) या व्हायरसने संक्रमित असल्याचं सापडलं. त्याच्याप्रमाणेच अनेक जंगली सशे या आजाराशी लढत आहेत.
हे वाचा - बापरे! हा नवा व्हायरस की आणखी काही? पाहा या छिद्र असलेल्या हातामागील नेमकं सत्य
गेल्यावर्षी मार्चमध्ये पाळीव सशात पहिल्यांदा हा व्हायरस सापडला होता. पण त्यावेळी प्रकरणं नव्हती. ओरेगॉनच्या मालह्युर काऊंटीत एप्रिलमध्ये पहिल्यांदाचा एका काळ्या शेपटीवाल्या जॅकरॅबिटचा यामुळे मृत्यू झाला होता. मे महिन्यात ख्रिसमस व्हॅलीतील लेक काऊंटीत याचं दुसरं प्रकरण सापडलं. तर आता नुकतंच क्रुक काऊंटीमध्ये आणखी एक प्रकरण सापडलं आहे.
काय आहे हा व्हायरस
हा व्हायरस खतरनाक आहे. कमी आणि जास्त दोन्ही तापमानात पसरतो. मृत सशांच्या शरीरातही हा व्हायरस बराच कालावधीपर्यंत असतो. सशाला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याची नर्व्हस सिस्टम खराब होते. नाकातून रक्त येतं. या व्हायरसमुळे सशांचा अचानक मृत्यू होऊ शकतो.
माणसांना आहे का या व्हायरसचा धोका.
हा व्हायरस संक्रमित सशाचा मल, संक्रमित पाण किंवा खाद्यपदार्थ, एखादी वस्तू किंवा कपड्यांमार्फतही पसरू शकतो. या व्हायरसने संक्रमित जंगली ससे पाळीव ससे आणि मांजरांच्या संपर्कात आल्यास त्यांना या आजाराचा धोका आहे. मृत सशांच्या शरीरातही हा व्हायरस बराच कालावधीपर्यंत असतो. अशा सशाजवळ दुसरा ससा किंवा मांजर आली तर त्यांना संसर्ग होऊ शकतो.
हे वाचा - हा कुत्रा की मांजर? VIDEO पाहून भलेभले कन्फ्युझ; तुम्हाला तरी ओळखता येतं का पाहा
या व्हायरसचा तसा माणसांना धोका नाही. पण व्हायरसच्या म्युटेशनबाबत सांगू शकत नाही. कारण यामुळे होणारा टूलारेमिया (Tularemia) नावाचा आजर माणसांमध्ये पसरू शकतो, जो जीवघेणा ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.