जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pune News: पुण्यात चिकनकारी साड्या घ्यायच्या? हे आहे खास ठिकाण

Pune News: पुण्यात चिकनकारी साड्या घ्यायच्या? हे आहे खास ठिकाण

Pune News: पुण्यात चिकनकारी साड्या घ्यायच्या? हे आहे खास ठिकाण

Pune News: पुण्यात चिकनकारी साड्या घ्यायच्या? हे आहे खास ठिकाण

पुण्यात चिकनकारी साड्यांसाठी प्रसिद्ध मार्केट आहे. आपल्याला एलिगंट लूक हवा असेल तर नक्की ट्राय करा.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 9 जुलै: भरतकामाचा विचार केला तर चिकनकारी निःसंशयपणे या यादीत अव्वल आहे. या सुंदर तंत्राचा उगम लखनऊमधून झाला आणि इथे अनेक सुंदर चिकनकारी साड्या बनवल्या जातात. एखादा लग्नसमारंभ असेल आणि साड्या नेसायची वेळ येणार असेल तर खूप जणांना जड आणि भरलेल्या साड्या घालायला नकोसं होऊन जातं. खूप जणांना लग्नातही एलिगंट लुक ठेवायला आवडतं. त्यामुळे अनेकजण आपल्याला वेगळा आणि चांगला लुक देऊ शकेल, अशा चिकनकारी साड्यांचा विचार करतात. पुण्यात चिकनकारी साड्यांचं खास मार्केट असून इथं 2 हजार रुपयांपासून साड्या मिळतात. पुण्यात आहे चिकनकारी साड्यांचं मार्केट पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या लखनौ चिकन पॅलेस दुकानात अस्सल चिकनकारी साड्यांचं कलेक्शन आहे. आपण त्यांना कॅज्युअल तसेच पार्टीच्या वेळी ते कॅरी करू शकतो. फंक्शन्ससाठी आपण हलक्या रंगाच्या चिकनकारी साड्यांची निवड करू शकतो. आयव्हरी कलरच्या साड्या अतिशय स्टायलिश दिसतात, त्यामुळे त्यांना डेच्या फंक्शनचा भाग बनवता येईल, असं दुकानदार शंतनू पानसरे सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

2 हजारांपासून मिळतात साड्या चिकन पॅलेसमध्ये साड्यांच्या किमती सर्वांना परवडणाऱ्या आहेत. 2 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये किमतीच्या साड्या या ठिकाणी मिळतात. आपण राखाडी रंगाची चिकनकारीच्या साडीला ब्लाऊजच्या कॉम्बिनेशनसह काळ्या आणि पांढऱ्या रंगात निवडू शकतो. तर, हिरव्या रंगाच्या चिकनकारी साडीसोबत गुलाबी किंवा लाल रंगाचा ब्लाउजही खूप स्टायलिश लुक देतो, असंही पानसरे म्हणतात. 17 व्या शतकातील नाण्यांपासून ते शोभेच्या अँटिक वस्तूंची करा खरेदी, पाहा पुण्यात कुठं आहे संधी चिकनकारी म्हणजे काय? चिकनकारी ही पारंपारिक शैलीतील भरतकामाचा एक प्रकार आहे. भरतकाम म्हणजे सौंदर्य, ज्यातून चिकनकारी साडी किंवा सूटचे सौंदर्य प्रकट होते. तुम्ही चिकनकारी साड्या त्यांच्या धाग्याने आणि नाजूक फॅब्रिकद्वारे सहजपणे ओळखू शकता. या भरतकामाचा विचार केला की, चिकनकारी कशी बनवायची हा पहिला प्रश्न पडतो? हे चिकन फॅब्रिकवर बनवले जाते. चिकनकारी भरतकामामध्ये 3 प्राथमिक पायऱ्यांचा समावेश असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात