पुणे, 8 जुलै : लाईफस्टाइल बदलत गेली तशा आवडीनिवडी बदलत गेल्या. आपल्या गरजेनुसार वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. मात्र अशातही जुन्या वस्तूंची भुरळ काही कमी होत नाही. साधारण दहा-वीस वर्षे उलटली की फॅशन जुनी होते. यातल्याच काही गोष्टी दुर्मिळ असतात ज्याला आपण अँटिक म्हणतो. काही चोखंदळ नजरा या अँटिक पीसला आपोआप शोधतात. त्यांचा वापर आवडीने करतात. यामध्ये बरेच तरुण फॅशन म्हणून या गोष्टींचा वापर करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुण्यातील कॅम्प परिसरातील एका अँटिक दुकानाबद्दल माहिती घेणार आहोत. कुठे मिळतील अँटिक वस्तू? पुण्यातील कॅम्प परिसरातील सिल्कीवर्ल्ड अँटिक वस्तूंचे दुकान आहे. या दुकानात अगदी 17 व्या शतकापासूनच्या वस्तू आपल्याला मिळतील. हल्ली बाजारात नवनवीन ब्रँड बघायला मिळतात. पण सुरुवातीच्या काळात काही कंपन्यांनी लोकांना वेड लावले होते. सध्या या कंपन्यांच्या काही वस्तूंचे उत्पादन बंद केले तसेच यातील काही उद्योगच बंद पडले. त्यामुळे आपल्याला हवी असलेली वस्तू मिळत नाही. जुन्या ब्रँड्सची क्रेझ त्यांच्या क्वालिटी, डिझाइन आणि व्हारायटीमुळे आजही कायम आहे, अशी माहिती सिल्कीवर्ल्ड दुकाने मालक समशीर खान यांनी दिली.
वेगळेपण काय? अँटिक वस्तूंमध्ये वेगळं काय असा प्रश्न अनेकांना पडत असेल, पण या अँटिक वस्तूंमध्येच खरी श्रीमंती मानणारी काही मंडळी आहेत. कारण या वस्तू कधीही न मिळणाऱ्या असतात. शिवाय त्यांचे डिझाइन आणि लूकही आता कुठे मिळणार नाही. त्यामुळे अशा वस्तूंनी स्वतःचेही वेगळेपण जपायचा प्रयत्न केला जातो. हवी असलेली वस्तू शोधण्यासाठी बऱ्याचदा जुना बाजार किंवा दुर्मिळ वस्तू मिळणाऱ्या दुकानांचा शोध घेतला जातो. याठिकाणी जुने ट्रे, भिंतीवरील घड्याळ, रेडिओ, जुनी भांडी यासारख्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. या वस्तू घरात ठेवण्यासाठी दूरदूरपर्यंत शोध घेतला जातो. या ठिकाणी वेगवेगळ्या देशातील अगदी दुर्मिळ पण तितक्याच मौल्यवान वस्तू या ठिकाणी मिळतील.
Pune News : ‘पुणे तिथे काय उणे…’ एवढं स्वस्त तर मुंबईत सुद्धा मिळणार नाही, तुम्हीच चेक कराकाय-काय खरेदी करू शकता? याठिकाणी तुम्हाला 17 व्या शतकातील नाण्यांपासून जुने टेलिस्कोप, पितळाच्या मूर्ती आणि जुने कॅमेरेही मिळतील. याठिकाणी अँटिक नाणी, जुने फोटो, बाहुल्या, शोपीस, परफ्युम, अंगठ्या, शोभेच्या वस्तू, एकेकाळी शाही कुटुंबाच्या शोभा वाढवणाऱ्या अनेक वस्तू तुम्हाला याठिकाणी अगदी सहज मिळू शकतील. लाखो रुपये किंमत असलेल्याया वस्तू देखील या ठिकाणी आहेत. एखादी कलाकुसर केलेली लाकडी संदूक, घड्याळ, अँटिक व्हॅल्यू असलेली नक्षीदार कृपाण, सुरी अशा गोष्टी या ठिकाणी मिळतील, असं समशीर खान यांनी सांगितले.