शॉपिंग हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. कोणत्याही सण-सभारंभाची वाट पाहण्याची आवश्यकता नसते. एखादं छोटं कारण ही शॉपिंगसासाठी पुरेसं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
स्ट्रीट शॉपिंगसाठी फॅशन स्ट्रीट हे सर्वात लोकप्रिय ठिकाणापैकी एक आहे. हे कॅम्प परिसरात असून तुम्हाला याठिकाणी कुर्ती, जीन्स, घड्याळे, दागिने, चप्पला, टॉप्स, नाईट वेअर, सौंदर्यप्रसाधने, पिशव्या, अशा सगळ्याच वस्तूंची तुम्हाला इथे खरेदी करता येते.
या मार्केटमध्ये कमी किमतीत सर्वात चांगले कपडे तुम्हाला खरेदी करता येतात. शिवाय या बाजारातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पारंपारिक आणि वेगळ्या फॅशनचे कपडे देखील मिळतात. याची किंमत 200 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यत आहे.
स्टायलिश कपडे हा या बाजाराचा प्रमुख विक्री केंद्र आहे. म्हणून जर तुम्हाला सर्वात लेटेस्ट कपडे खरेदी करायचे असतील तर फॅशन स्ट्रीटमध्ये जाऊन खरेदी करू शकतात.
हे सर्व तुमच्या बजेटमध्ये देखील आहे. परिणामी, बजेटमध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला खर्चाची चिंता करण्याची गरज नाही.
अनेक वस्तूंची कमी किंमत असली तरी त्यांची क्वालिटी चांगली आहे. ते तुमच्या ब्रँडेड वस्तू पेक्षा जास्त काळ टिकू शकते .
प्रत्येक विक्रेत्याचा स्वतःचा स्टॉल आहे. मार्केटच्या आतील गल्ल्या अतिशय अरुंद आणि गर्दीच्या आहेत. इथे तुम्हाला हवं ते शॉपिंग करू शकता.
फॅशन स्ट्रीटमध्ये लहान मुलांचे शूज, बॅग्स, मुलींचे ड्रेस, गॉगल्स,बेल्ट,शूज, जिन्स असं सगळंच तुम्हाला फॅशन स्ट्रीट मध्ये शॉपिंग करतात येईल. याची किंमत 200 पासून 1000 रुपये पर्यंत आहे.