जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्राचीन काळीन भाजी म्हणून भोपळ्याला आहे विशेष महत्त्व; आरोग्यासोबत इतके आहेत फायदे

प्राचीन काळीन भाजी म्हणून भोपळ्याला आहे विशेष महत्त्व; आरोग्यासोबत इतके आहेत फायदे

प्राचीन काळीन भाजी म्हणून भोपळ्याला आहे विशेष महत्त्व; आरोग्यासोबत इतके आहेत फायदे

सध्या अमेरिका, मेक्सिको, भारत आणि चीन या देशात भोपळ्याचे सर्वाधिक उत्पादन होते. ही भाजी इतर भाज्यांपेक्षा जास्त वजनदार आहे. त्याचे सामान्य वजन 4 ते 8 किलो पर्यंत असते. भारतातही भोपळ्याला पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 एप्रिल : जगातील प्राचीन भाज्यांविषयी बोलायचे झाल्यास त्यात भोपळा प्रमुख आहे. इतर भाज्यांपेक्षा वजनाने जड असणारी ही भाजी आहे. एकेकाळी ही गरिबांची भाजी मानली जायची, पण आता तशी परिस्थिती नाही. भोपळ्याचे पीक जगभर पिकवले जाते आणि आवडीनं खाल्ला जातो. भारतात भोपळ्याला धार्मिक आणि पौराणिक संदर्भ आहेत, तर परदेशात भाजीपाल्या व्यतिरिक्त त्याची वेगळी ओळख आहे. भारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये, भोपळ्याचे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर वर्णन केले आहे. भारतात हजारो वर्षांपासून भोपळ्याची लागवड केली जात आहे. पण इतर देशांमध्ये ते आधीच अस्तित्वात आले होते. इतिहासाच्या पुस्तकांमधून मिळालेल्या माहितीनुसार, भोपळ्याचे मूळ उत्तर अमेरिकेत असल्याचे मानले जाते आणि त्याच्या बिया 7000 ते 5000 ईस.पूर्व सापडल्या आहेत. सिंधू संस्कृतीत (सुमारे 2500 ईस.पूर्व) तेथे पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये भोपळ्याचे कोणतेही वर्णन नाही. त्या प्राचीन काळी जवाबरोबरच गहू, तांदूळ, वांगी, मोहरी, ताग, कापूस इ. याचे वर्णन आयुर्वेदिक ग्रंथ ‘चरकसंहिता’ (इ.स.पू. ७वे-८वे शतक) मध्ये केले आहे, त्याला कुष्मांडाही म्हणतात. सध्या अमेरिका, मेक्सिको, भारत आणि चीन या देशात भोपळ्याचे सर्वाधिक उत्पादन होते. ही भाजी इतर भाज्यांपेक्षा जास्त वजनदार आहे. त्याचे सामान्य वजन 4 ते 8 किलो पर्यंत असते. भारतातही भोपळ्याला पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे. काही धार्मिक विधींमध्ये पशुबळी देण्याची पद्धत आहे. तेथे भोपळा हा प्राणी समजून त्याचा बळी दिला तर तो धर्मानुसार तो पशुहत्या समतुल्य मानला जातो. हे वाचा -  Laughing Buddha ची मूर्त घरात कुठे ठेवावी; ‘या’ 3 ठिकाणी ठेवली तर होईल नुकसान पूर्वांचलच्या छठ सणाबद्दल अनेकांना माहिती असेल. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी आंघोळ करून जेवणासाठी खास भोपळ्याची भाजी तयार केली जाते आणि उपवास ठेवणारे लोक ते खातात. भोपळ्याचा आकार मोठा असल्याने त्याची भाजी एका वेळी जास्त होते. ही एवढी संवेदनशील भाजी आहे की ती कापून तशीच राहिल्यास बुरशी लागू शकते (विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात). त्यामुळे भोपळा कापल्यानंतर तो लगेच संपवावा लागतो. हे वाचा -  सकाळी दात न घासता पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या सविस्तर पाश्‍चिमात्य देशांमध्ये दरवर्षी 31 ऑक्‍टोबरला हॅलोविन डे (Halloween day) साजरा केला जातो. एकमेकांना घाबरवण्यासाठी भीतीदायक पेहराव करण्याचा हा सण असतो. या दिवशी भोपळ्याला खूप मागणी असते. इतरांना घाबरवण्यासाठी युवक भोपळा कापून त्याचा पेहराव बनवून भितीदायक चेहरा करतात. भाजी म्हणून भोपळ्याला परदेशात मोठी मागणी आहे. आता कॅन केलेला भोपळा अनेक पाककृतींमध्ये उपलब्ध आहे. चरकसंहितेच्या ‘सूत्रस्थान’ स्थित सप्तविंशोध्यायातील ‘शकवर्ग’मध्ये भोपळा क्षारीय, मधुर-आम्ल आणि तिन्ही दोषांचा नाश करणारा (वात-पित्त-कफ) असल्याचे वर्णन आहे. पोटाच्या आरोग्यासाठी भोपळा फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात