मुंबई, 22 मे : देशभरात मान्सूनच्या पावसाची (monsoon season) चाहूल लागली आहे. काही राज्यातर मान्सूपूर्वी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आता मान्सूससाठी प्रत्येकाने आवश्यक तयारी करायला हवी. पावसाळ्यात तुम्ही घर जितके स्वच्छ ठेवू शकता तितकेच ते तुमच्यासाठी चांगले राहील. कारण, पावसात पाणी साचल्याने अनेक प्रकारचे जंतू वाढू लागता.त ज्यामुळे रोग होऊ शकतात. यासोबतच न वापरलेल्या वस्तू काढून टाका, यामुळे घर मोकळे दिसते. यावेळी पावसाळ्यात तुम्हाला विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण, अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. थोडेसे निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. बाहेर शू रॅक, रेनकोट आणि छत्रीची व्यवस्था करा शक्य असल्यास घराबाहेर छत्री, रेनकोट आणि पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था करा. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची शक्यता कमी होईल. घराबाहेर हात धुण्याची व्यवस्था असेल तर बरे होईल. रग्ज आणि कार्पेट्स अर्थात, फॅन्सी रग्ज आणि कार्पेट्स घराच्या सौंदर्यात भर घालतात. पण, पावसाळ्यात ते गुंडाळून प्लास्टिकच्या शीटमध्ये बांधणे चांगले. पावसाळ्यामुळे हवामानात ओलावा राहतो, त्यामुळे जंतूंची वाढ होण्याची शक्यता असते. सांडपाण्याची समस्या नाही पावसाळ्यापूर्वी घरातील सर्व नाले एकदा तपासून पहा की त्यात कोणत्याही प्रकारची समस्या तर नाही ना, कारण त्याकडे दुर्लक्ष करणे जड जाऊ शकते. नाल्यांच्या समस्येमुळे घाण पाणी साचू लागते. त्यामुळे घरामध्ये दुर्गंधी सोबतच अनेक प्रकारचे आजार पसरतात. तुम्ही चहाचे शौकीन असाल तर ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात! काय साठवले आहे ते पहा हवामानातील ओलावा देखील अन्नपदार्थ खराब करते, त्यामुळे आपण साठवलेल्या वस्तू कशा सुरक्षित ठेवू शकतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. मीठ, साखर, कॉफी यांसारख्या गोष्टी चिकट झाल्या तर या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी डब्यात तांदळाचे काही दाणे ठेवा. मान्सूनचा पाऊस म्हणजे काय? देशातील मान्सून अर्थात पावसाळा हा अनेक मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियांनी बनलेला असतो. मे-जून महिन्यात भारतीय द्वीपकल्पात उष्णता (Heat) वाढते. तर त्या तुलनेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आसपासचे तापमान कमी असते. तापमानातल्या या फरकामुळे समुद्रातील पाण्यामुळे तयार झालेले ढग मोठ्या प्रमाणात उत्तर भारताकडे सरकतात आणि तिथे जाताना संपूर्ण भारतात पाऊस पडतो, याला मान्सूनचा पाऊस असं म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







