मुंबई, 24 मार्च: महिला सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत; पण अनेक ठिकाणी महिलांना कामाच्या ठिकाणी भेदभावाला (Pregnant woman discriminated at work place) सामोरं जावं लागतं. काम करताना अनेक महिलांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशाच एका प्रकरणात गर्भवती महिलेला काम करताना त्रास देणाऱ्या बॉसला न्यायालयाने लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. गरोदरपणात (Pregnancy) नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी भेदभावाला (Working Place Discrimination) सामोरं जावं लागतं. ब्रिटनमध्ये एका महिलेच्या बॉसने (Britain News) मर्यादा ओलांडली. त्याने तिला गरोदरपणात खूप टोमणे मारले. यामुळे वैतागलेली ती महिला न्यायालयात पोहोचली. तिला टोमणे मारल्यामुळे बॉसला तब्बल 38 लाख रुपयांची नुकसानभरपाई (Pregnant woman wins over 38 lakh discrimination case) द्यावी लागली. ही घटना चेशायरमधल्या गेलाटो कॅफेमध्ये घडली. तिथे अॅबी नावाची महिला काम करायची. गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात जेव्हा तिला आइस्क्रीम काढताना आणि बॉक्स उचलण्यासाठी खाली वाकताना त्रास होऊ लागला, तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांनी तिला कामाच्या ठिकाणी टोमणे मारायला सुरुवात केली. याबाबत तिने आपल्या बॉसकडे तक्रार केली असता त्याचे उत्तर ऐकून महिलेला धक्का बसला.
अँड्रॉईड युजर्सासाठी गुगलनं लाँच केलं ‘हे’ नवीन फीचर, जाणून घ्या अधिक माहितीमिररच्या वृत्तानुसार, बेकरी आणि आइस्क्रीमच्या (ice cream) दुकानात काम करणाऱ्या महिलेने खाली वाकून केक उचलण्यास नकार दिला. त्यानंतर सहकारी कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीच्या प्रेग्नन्सीचा हवाला देऊन सांगितलं, की त्यानं तिला या स्थितीत काम करू दिलं नसतं. अॅबीने याबाबत बॉस फैसल मोहम्मद यांच्याकडे तक्रार केली असता, त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्याने तिला टोमणे मारले. महिलेचा बॉस म्हणाला, की ‘जर ती असं काम करू शकत नसेल, तर तिने दुसरी नोकरी (job) शोधावी. कारण तिला याच कामाचे पैसे (money) मिळतात.’ एवढंच नाही, तर त्याने महिलेला डिमोट केलं आणि तिला भेदभावाला सामोरं जावं लागलं.
लहानपणापासून मेंदूत होता…; डोकेदुखीचं खरं कारण समजताच हादरली तरुणीभेदभाव आणि बॉसच्या उत्तरामुळे संतापलेल्या अॅबीने हे प्रकरण न्यायालयात नेलं. या नोकरीमुळे महिलेच्या बाळाला नुकसान पोहोचण्याचा होण्याचा धोका असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. तिच्या कामगिरीच्या जोरावर महिलेला 4 महिन्यांत प्रमोशन (promotion) मिळालं होतं; पण गर्भधारणेमुळे तिच्याशी भेदभाव केला जाऊ लागला. शिवाय तिचा पगारही कमी करून तिला डिमोट करण्यात आलं. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने कंपनीला अॅबीला 38 लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्यास सांगितलं.