मुंबई, 8 जानेवारी : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास असतो, पण त्यात काही आव्हानेही येतात. गरोदरपणात महिलांना केस गळण्यापासून ते हात-पायांवर सूज येण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. संपूर्ण 9 महिने महिलांना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होतो. विशेषतः हात-पायांची सूज महिलांना सतत त्रास देते. कधीकधी काही महिलांसाठी ते खूप त्रासदायक ठरते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बंगळुरूच्या सराजपूरच्या मदरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शेफाली त्यागी यांनी या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. डॉ. शेफाली त्यागी यांच्या मते, जेव्हा तुम्हाला तुमचे हात किंवा पाय सुजलेले दिसतात तेव्हा त्रास होतो. पण कोणत्या परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, हे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच त्यांनी हात-पाय सुजल्याचे कारणही सांगितले आहे.
गरोदरपणात हेअर डाय वापरताय? मग हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती असायलाच हवेडॉ. शेफाली त्यागी म्हणतात, ‘तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढतो, त्यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या अर्ध्या भागाच्या नसांवर दबाव येतो. त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. यामुळे शिरामध्ये द्रवपदार्थ टिकून राहतात, जे आजूबाजूच्या ऊतींमध्ये देखील जाऊ शकतात. यामुळे हात-पायांवर सूज येऊ शकते. डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेदरम्यान हात-पायांवर सूज असते.
त्या पुढे म्हणाल्या की, या स्थितीला ‘फिजियोलॉजिकल एडिमा’ असेही म्हणतात आणि ती तिसऱ्या तिमाहीत सामान्य असते आणि ही सूज याच काळात सुरू होते. डॉक्टर पुढे हेदेखील म्हणाल्या की, ‘सूज दिवसागणिक वाढू शकते. कारण हृदयापासून दूर असलेल्या शरीराच्या त्या भागांमध्ये द्रव साचण्याचा धोका असतो. जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते तसतसे सूज वाढणे सामान्य असते. सूज कमी करण्यासाठी काय करावे - उष्ण आणि दमट हवामानात बाहेर जाणे टाळा. - जास्त वेळ उभे राहणे टाळा आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी दररोज पायांची मालिश करा. - झोपताना किंवा बसताना पायाखाली उशी ठेवा. - तुम्ही सोडियम म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी केले पाहिजे, कारण गरोदरपणात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. - तसेच कॅफीन घेणे टाळा, यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे सूज येण्याची समस्या वाढू शकते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)