Home /News /lifestyle /

बाळंतपणानंतर आहारात असायलाच हवेत 'हे' पदार्थ

बाळंतपणानंतर आहारात असायलाच हवेत 'हे' पदार्थ

स्त्री बाळंत होते तेव्हा तिच्या शरीरातून खूप मोठ्या प्रमाणात रक्त कमी होतं ते भरून येण्यासाठीच बाळंतपणानंतर 45 दिवस जावे लागतात.

मुंबई, 7 सप्टेंबर: घरात बाळ येणं (Birth of a child ) ही खरोखरच सगळ्या कुटुंबीयांसाठी आनंदाची गोष्ट असते. त्या बाळासाठी त्याचे आईवडिल, आजीआजोबा छान कपडे आणून ठेवतात. बाळासाठी पाळणा आणला जातो आणि त्याची कशी काळजी घ्यायची याची तयारीही केली जाते. तसंच त्या बाळाला जन्म देणाऱ्या आईचीही (new mother care) विशेष काळजी घेतली जाते. हा सगळा आनंद सोहळाच असतो. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बाळंतीणीला (Pregnant Women) डिंकाचे, अळीवाचे लाडू खायला दिले जातात. तिच्या अंगाला मालीश केली जाते. तिच्या शरीराची झालेली झीज भरून निघावी ही त्यामागची अपेक्षा असते. बाळंत झाल्यावर कोणता आहार घ्यावा (Healthy Diet) हे डॉक्टरांबरोबर घरातल्या अनुभवी स्त्रियाही सांगत असतातच. 40 दिवस हवी विश्रांती जेव्हा स्त्री बाळंत होते तेव्हा तिच्या शरीरातून खूप मोठ्या प्रमाणात रक्त कमी होतं ते भरून येण्यासाठीच बाळंतपणानंतर 45 दिवस जावे लागतात. त्यामुळे डॉक्टर (Doctor) असा सल्ला देतात की बाळंतीणीला 40 दिवस विश्रांती घ्यायला सांगा. घरातली कुठलीही काम तिला करू देऊ नका. यातही तोच उद्देश असतो की तिच्या शरीरातील झीज भरून निघावी. खरं तर बाळंतपणानंतर लगेचच बाळंतीणीच्या आहारावर खूप लक्ष देणं गरजेचं असतं. बाळंतपणातील श्रमांमुळे बराच काळ बाळंतीणीला तिच्या आहाराबद्दल फारसा विचार करणंच शक्य नसतं त्यामुळे इतरांनीच तिची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे तिच्या शरीराला शक्ती देणारे पदार्थ तिला खायला द्यावेत. एक झोका... घ्या झोपळ्यावर बसण्याचा आनंद! आरोग्याला होईल बराच फायदा पालेभाज्यांमध्ये शक्ती असते त्यामुळे त्या बाळंतीणीला दिल्या तर तिच्या शरीरात शक्ती येते. बाळंतपणात शरीरातील पाण्याचं प्रमाण (Water level in body) कमी होतं त्यामुळे पालेभाज्यांचं सूप करून तिला दिलं तर ते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं आणि पालेभाज्यांची शक्तीही तिला मिळते. औषधं आणि इतर गोष्टींमुळे बाळंतीणीच्या तोंडची चव गेलेली असते. अशावेळी तिला खारी बिस्किटं दिली तर तिच्या तोंडाला चव येते आणि बिस्किटातील कार्बोहायड्रेट्समुळे तिला शक्ती मिळते. मीठामुळे तिच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्सही राखला जातो. बाळंतीणीच्या शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे लोहाचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे तिला सुकवलेले खजूर म्हणजेच खारीक खायला द्यावी. त्यानी तोंडाला चव येतेच पण लोह पण मोठ्या प्रमाणात मिळतं. अनेक महिलांना बाळंत झाल्यावर बद्धकोष्ठाचा त्रास होतो अशावेळी त्यांना फायबरयुक्त आहार (fibre) द्यायला हवा. त्यांना फळं खायला द्यावी म्हणजे त्यांच्या शरीराला फायबर मिळतं आणि त्याचबरोबर त्यांचं बद्धकोष्ठही कमी होतं. नाश्त्यानंतर किती वेळाने जेवावं? वेळेत जेवला नाहीत तर होतील गंभीर परिणाम अशाप्रकारे आहार दिला तर बाळंतीणीच्या शरीराची झालेली झीज लवकर भरून निघेल आणि तिची तब्येत सुधारेल कारण बाळाला सांभाळणं हे मोठं काम करण्यासाठी ती तयार हवी ना.
First published:

Tags: Mother, Pregnant woman, Woman

पुढील बातम्या