मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आई-बाबा व्हायचंय? प्रजननक्षमता वाढवण्याचा आयुर्वेदिक मार्ग

आई-बाबा व्हायचंय? प्रजननक्षमता वाढवण्याचा आयुर्वेदिक मार्ग

वंध्यत्वार मात करण्यासाठी आणि प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक मार्ग आहेत.

वंध्यत्वार मात करण्यासाठी आणि प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक मार्ग आहेत.

वंध्यत्वार मात करण्यासाठी आणि प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक मार्ग आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 28 मार्च : बऱ्याच वेळा लग्नानंतर अनेक वर्षे झाली तरी जोडप्यांना मूल होत नाही. अशावेळी वेगवेगळे उपचार घेतले जातात. परंतु तरीही गर्भधारणा (Pregnancy) होताना अनेकदा अडचणी येतात. मुळात गर्भधारणा (Pregnant) होण्यासाठी प्रजननक्षमता उत्तम असणं गरजेचं आहे. मात्र बदललेली जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे लैंगिक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. अनेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. पण या वंध्यत्वार मात करण्यासाठी आणि प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक मार्ग आहेत.

आयुर्वेदानुसार शरीरातील कोणत्याही असामान्य कार्याची मुख्य कारणं म्हणजे अग्निमांद्य (शरीराच्या पाचक अग्नीची विकृती) आणि त्रिदोष दुष्टी. शरीराचं बळ, स्वास्थ्य, वर्ण, कांती, उत्साह, आयुष्य हे सर्व अग्नीवर अवलंबून असतं. त्यामुळे साहजिकच जोपर्यंत अग्नी प्राकृत तोपर्यंत शरीर प्राकृत अवस्थेत असते. अग्नी बिघडला की शरीराचे गणित बिघडतं.

वेदिक्युअर हेल्थ अँड वेलनेस क्लिनिकच्या सहाय्यक वैद्यकीय संचालक डॉ. वैशाली सावंत चव्हाण यांंनी सांगितलं, जर तुम्ही कोणत्याही वंध्यत्वाचा सामना करण्याचा विचार करत असाल तर आयुर्वेद तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल. कोणतीही गुंतागुंत होणार नाही आणि आयुर्वेदिक चिकित्सक आपल्या प्रजनन समस्येमागील मूळ कारण तपासण्यासाठी तुमचं संपूर्ण वैद्यकीय परीक्षण करतील. म्हणूनच, आयुर्वेदिक उपचारांचा विचार करायचा असल्यास एखाद्या मान्यताप्राप्त आयुर्वेदिक चिकित्सकाकडे जाऊन उपचार घेणं गरजेचं आहे.

प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आहार कसा असावा?

1) दररोज आहारात खजूर, भोपळा, केशर, मध, सोयाबीन, मटार, संपूर्ण धान्य, हळद, काळे जिर आणि शेंगदाणे समाविष्ट करा.

खीर, दूध, तूप यासारख्या गोड आहारातील उत्पादनांमुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

2) काळे तीळ, मेथी दाणे, बाळंता शेपा गर्भाशय शुद्ध करण्यास आणि निरोगी एंडोमेट्रियल अस्तर सुधारण्यास मदत करतं.

हे वाचा - कसं शक्य आहे? बाळ जन्माला येईपर्यंत तिला माहितीच नव्हतं की ती प्रेग्नंट होती

3) चरबीयुक्त आणि चुकीचा आहार टाळला पाहिजे.

4) धूम्रपान करणं, मद्यपान करणं, कार्बोनेटेड पेये आणि कॅफिनचं सेवन शक्यतो टाळावं.

5) नियमितपणे व्यायाम, योगा करणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. व्यायामामुळे तुमची प्रजननक्षमता वाढू शकतं. आपले शरीर शांत ठेवण्यासाठी प्राणायाम करू शकता. यामुळे मनावरील तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत मिळते.

प्रजननक्षमतेसाठी आवश्यक आयुर्वेदिक औषधं आणि उपचार

1) अश्वगंधा, शतावरी यांसारखी औषधं प्रजननसंस्थेचं पोषण करतात.

2) हिंगासारखी औषधं स्त्रीबीज निर्मिती करण्यासाठी मदत करतात.

3) वंग, शीलाजीत इत्यादी औषधे गर्भाशय नलिका सामान्य ठेवण्यास मदत करतात.

4) लताकरंजसारखी औषधं गर्भाशय शुद्ध करण्यास मदत करतात.

5) शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी कवचबीजांसारख्या औषधांचा फायदा होतो.

हे वाचा - बालपणापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, प्रत्येक टप्प्यात कसा असावा महिलांचा आहार

6) प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मेडिकेटेड एनीमा (बस्ती), नाकात औषधी थेंब (नस्य) हे उपचार घेऊ शकता. औषधी तेलामुळे गर्भाशयाचे शुद्धीकरण करण्यात येतं (उत्तरबस्ती). परंतु हे उपचार करण्यासाठी आपले आयुर्वेदिक तज्ज्ञ आपल्यासाठी शिफारस करतील.

First published:

Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman