Home /News /lifestyle /

क्रिएटिव मात्र स्वार्थी स्वभावाचे असतात B ब्लड ग्रुपची लोक; त्यांच्याविषयी जाणून घ्या या गोष्टी

क्रिएटिव मात्र स्वार्थी स्वभावाचे असतात B ब्लड ग्रुपची लोक; त्यांच्याविषयी जाणून घ्या या गोष्टी

Blood Group B: रक्तगटावरून माणसाचा स्वभाव, भविष्य आणि इतर गोष्टींची माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या रक्तगटांप्रमाणे माणसाचा स्वभावही वेगळा असतो. B रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Blood Group B) जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 05 मे : रक्तगटावरून केवळ आरोग्याची कारणे शोधता येत नाहीत, तर या माध्यमातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, त्याचे भविष्य (Prediction), त्याचे शिक्षण/करिअर याविषयीही माहिती मिळू शकते. ज्योतिषशास्त्र (Astrology) हे विज्ञानाच्या अनेक शाखांपैकी एक मानले जाऊ शकते. तसे, ज्योतिषशास्त्राच्या इतर शाखांमध्ये कुंडली (Kundali), हस्तरेषा, अंकशास्त्र, फेस रीडिंग, स्वाक्षरी रीडिंग इ. द्वारे व्यक्तीचा स्वभाव, त्याचे भविष्य आणि इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती काढता येते. आज आपण रक्तगटावरून माणसाचा स्वभाव, भविष्य आणि इतर गोष्टींची माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या रक्तगटांप्रमाणे माणसाचा स्वभावही वेगळा असतो. B रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Blood Group B) जाणून घेऊया. B रक्तगटाच्या लोकांचा स्वभाव - B रक्तगटाच्या लोकांचा स्वभाव नेहमी इतरांना मदत करण्याचा असतो. वेळ आल्यावर इतरांसाठी जीव देण्यापासूनही ते मागे हटत नाहीत. हे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात आणि प्रत्येक नात्याला खूप महत्त्व देतात. B रक्तगटाचे लोक दिसायला सुंदर आणि हुशार असतात. B रक्तगटाच्या लोकांची कमतरता - B रक्तगटाचे लोक मल्टी-टास्किंग नसतात. इतरांना मदत करत असले तरी हे स्वार्थी प्रकारचे लोक आहेत, असे म्हटले जाते. यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागते. राग त्यांच्या नाकावर टिच्चून ठेवलेला असतो. तसेच, खर्चाचा विचारही करत नाहीत. बी रक्तगटाच्या लोकांची वैशिष्ट्ये - B रक्तगटाचे लोक खूप सर्जनशील असतात. हे लोक कोणताही निर्णय घेण्यास उशीर करत नाहीत. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात. हे विश्वसनीय मित्र बनवतात. हे वाचा - घरामध्ये घड्याळ लावताना या चुका करू नका; दिशा चुकली तर अनेक गोष्टी बिघडतात प्रेम जीवन आणि विवाहित जीवन - B रक्तगटाचे लोक चांगले आणि मनाने खरे असतात. ते ज्यांच्याशी प्रेम करतात किंवा लग्न करतात ते भाग्यवान असतात. कारण ते आपल्या जोडीदाराचा खूप आदर करतात, तसेच त्यांची खूप काळजी घेतात. ते आपल्या पार्टनरला नेहमी स्पेशल फील देतात. हे वाचा - पलंग-गाद्या सोडा फरशीवर झोपा! इतक्या शारीरिक त्रासांपासून होईल तुमची सुटका (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिशशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astronaut, Lifestyle

    पुढील बातम्या