मुंबई, 29 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) सॅम बॉम्बेसह (Sam Bombay) लग्न केलं. त्यानंतर ती हनीमूनला गेली. मात्र तिथं गेल्यानंतर काही दिवसांतच तिनं आपल्या पतीवर आरोप लावले. आपल्या पतीने आपला छळ केला, आपल्याला मारहाण केली असे आरोप केले. पतीविरोधात तिने तक्रार केली आणि त्यानंतर काही दिवसांतच तिनं पुन्हा आपल्या सोशल मीडियावर दोघांचेही फोटो शेअर करून सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवलं. यानंतर पूनमने हा ड्रामा BIG BOSS 14 साठी केल्याची चर्चा सुरू झाली.
खरंच पूनम पांडेने BIG BOSS 14 मध्ये येण्यासाठी स्पॉटलाइटमध्ये येण्यासाठी तिने हा ड्रामा केला होता का? अशा चर्चा रंगू लागल्यानंतर पूनम पांडेने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आपण असं का केलं याचा खुलासा तिने केला आहे.
ETimes शी बोलताना पूनम पांडेने हे वृत्त फेटाळलं आहे. आपण बिग बॉस 14 मध्ये सहभागी होणार नाही आहोत, या सिझनचा आपण भाग नाही असं तिनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या शोमध्ये येण्यासाठी आपण हा ड्राम केला नाही, असं ती तिनं सांगितलं. पूनम पांडे म्हणाली, "नाही, मी बिग बॉस 14 चा भाग नाही. बिग बॉग सारख्या कार्यक्रमाचा भाग होण्याइतपत मी मोठी नाही"
हे वाचा - नोरा फतेहीला 'चुकीच्या' ठिकाणी स्पर्श केल्याच्या आरोपाबाबत टेरेन्सचं स्पष्टीकरण
गोव्यात हनीमूनला गेल्यानंतर पूनमने पतीवर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर हे प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की पोलिसांनी तिचा पती सॅम बॉम्बेला अटक केलं होतं. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दक्षिण गोव्यातील कॅराकोनामध्ये घडली. जिथं पूनम पांडे एका चित्रपटाचं शूटिंग करीत होती. कॅनाकोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितलं की, पूनमने रात्री उशिरा तक्रार दाखल केली. तिचा पती सॅम बॉम्बे याने तिच्यासोबत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तिनं सांगितलं.
हे वाचा - 'गांजा वापराला कायदेशीर परवानगी द्या'; लेखिका तस्लिमा नसरीन यांचा सल्ला
पूनमने सॅम आणि आपल्यात खरोखरच वाद झाल्याचं सांगितलं. मात्र आता त्या दोघांमध्ये सर्वकाही ठिक झाल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या नात्यात आलेला काही वेळेचा दुरावा आता दूर झाला आहे. ते पुन्हा एकमेकांजवळ आले आहेत. आता लवकरच दोघंही गोव्याहून मुंबईला परतणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Poonam pandey