• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पालकांनो सावध राहा! कोरोनानंतर AFM चं संकट; मुलांमधील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको

पालकांनो सावध राहा! कोरोनानंतर AFM चं संकट; मुलांमधील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको

पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा.

पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा.

पुढील चार महिन्यांत एक्युट प्लेसिड म्येलिटिस (Acute Flaccid Myelitis) थैमान घालणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 20 ऑगस्ट : डेल्टा व्हेरिएंटचा (Delta variant) धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. लहान मुलांनाही याचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशात आता लहान मुलांवर आणखी एक संकट ओढावणार आहे. कोरोनानंतर आता लहान मुलांना एक्युट प्लेसिड म्येलिटिस (Acute Flaccid Myelitis) या आजाराचा धोका आहे.  एएफएमबाबत पालक आणि डॉक्टरांना अलर्ट करण्यात आलं आहे. पुढील चार महिन्यांत एक्युट प्लेसिड म्येलिटिस थैमान घालणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (Centers for Disease Control and Prevention) याबाबत सावध केलं आहे. याबाबत एक रिलीज जारी करून सविस्तर माहिती दिली आहे. काय आहे एक्युट प्लेसिड म्येलिटिस एएफएम हा पोलिओसारखा आजार आहे. गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामुळे विशेषतः पाठीच्या मणक्याजवळील क्षेत्र ज्याला ग्रे मॅटर म्हटलं जातं, त्यावर परिणाम होतो. यामुळे शरीरातील मांसपेशी कमजोर होतात. अमेरिकेत 2014, 2016 आणि 2018  साली या आजाराची बरीच प्रकरणं दिसून आली होती. एक्युट प्लेसिड म्येलिटिसची लक्षणं शरीरात कमजोरी श्वास घ्यायला त्रास ताप घसा आणि पाठीत वेदना न्यूरोसंबंधित लक्षणं हे वाचा - भारतातल्या मुलांसाठी आणखी एक लस, जॉन्सन अँड जॉन्सनने ट्रायलसाठी मागितली परवानगी 2014 नंतर दर दोन वर्षे या आजारामुळे पॅरालिसिसची अनेक प्रकरणं समोर आली आहे. 2018 मध्ये याचा प्रकोप झाला होता. 42 राज्यांमध्ये 239  रुग्ण सापडले होते. त्यापैकी जवळपास 95 टक्के लहान मुलं होती, अशी माहिती सीडीसीने दिली आहे. या आजारावर कोणतेही उपचार नाही. सुरुवातीच्या लक्षणांनुसार उपचार केल्यास परिणाम दिसून येतो.  त्यामुळे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणं शक्य होईल. त्यामुळे वरीलपैकी लक्षणं दिसल्यास विशेषत: ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये असे रुग्ण आढळल्यास त्यांना एएफएमचे संशयित रुग्ण समजून तात्काळ रुग्णालयात दाखव करावं, असा सल्ला सीडीसीने दिला आहे. हे वाचा - Delta च्या संकटात Oxford ने वाढवलं टेन्शन; कोरोना लशीबाबत धक्कादायक रिपोर्ट कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगमुळे एएफएम रुग्णांना उपचार मिळण्यात उशीर होण्याची तसंच प्रकरणं वाढण्याची आणि याचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे आपात्कालीन विभागीतल बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी तयार राहावं आणि रुग्णांना तात्काळ रुग्णालयात भरती करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: