नवी दिल्ली, 13 एप्रिल : उन्हाळा सुरू होताच आपण खाण्या-पिण्यात हलक्या आणि सकस आहाराचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे शरीरात अन्नातून विषबाधा होण्याचा धोका राहत नाही. या हंगामात फळे आणि भाज्या (vegetables) खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. आपल्या स्वत:च्या बागेत भाज्या लावल्या तर मग सोन्याहून पिवळं. रासायनिक खते-औषधे वापरत नसल्याने घरच्या बागेत पिकवलेल्या भाज्या आरोग्यास उत्तम असतात. याचा शरीरासाठी फायदा होतो. आज अशाच काही भाज्यांबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची पेरणी एप्रिल महिन्यात केली तर चांगली वाढ होऊ शकते. ही भाजी वर्षभर येत असली तरी एप्रिल महिना यासाठी अधिक चांगला मानला (What vegetables to plant in the home garden in April) जातो. मक्का किंवा कॉर्न तुम्ही तुमच्या घराच्या बागेत या महिन्यात मक्याची रोपे लावू शकता. याची लागण करणं खूप सोपं आहे. आपण ते एखाद्या भांड्यात किंवा कंटेनरमध्ये सहजपणे लावू शकता. मका नीट उगवण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश, थोडेसे पाणी आणि खेळती हवा माती ओलसर ठेवण्यासाठी आवश्यक आहे. मक्याचे दाणे तुम्हाला बाजारात सहज मिळतील. बीट आणि मुळा तसे, आपण प्रत्येक हंगामात बीट वनस्पती लावू शकता. परंतु, मार्च आणि एप्रिल हे महिने बीटच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जातात. त्याची रोपं कुंडीत किंवा भांड्यात 1 इंच आत लावा. तुम्ही बीटरूट घरामध्ये आणि घराबाहेर पेरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही घरच्या घरी मुळा आणि इतर जमिनीत वाढणाऱ्या भाज्या देखील लावू शकता. हे वाचा - अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच! कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा हिरवा कांदा जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही एप्रिल महिन्यात हिरव्या कांद्याची लागवड करू शकता, या महिन्यात त्याची चांगली वाढ होते. तुम्ही फक्त जमिनीत हिरवे कांदेच लावू शकत नाही तर ते पाण्यातही वाढवू शकता. शिमला मिर्ची सिमला मिरची ही एक सदाहरित वनस्पती आहे, जी प्रत्येक हंगामात वाढते, परंतु एप्रिलच्या शेवटी लागवड करणे चांगले मानले जाते. त्याचे बियाणे तुम्ही एप्रिलच्या शेवटच्या 8 ते 10 दिवस आधी घरगुती बागेत लावू शकता. हे वाचा - Mulberry: छोटंस दिसणारं हे फळ किडनी, फुफ्फुसांसह त्वचा विकारांवरही आहे भारी घरच्या बागेत भाजीपाला लावण्यासाठी काही टिप्स शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत चांगले मिसळा. चांगले मिसळून झाल्यावर त्यात बिया टाका आणि वरून थोडे पाणी शिंपडा. जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्या. आता हळुहळु तुमची रोपे अंकुरण्यास तयार होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.