घमुंबई, 20 जानेवारी : तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा तंत्रज्ञान वापरताना गडबड झाली की गंमतीदार प्रसंग घडताता. सोशल मीडियावर याची उदाहरणं अनेकदा बघायला मिळतात. आताही असाच एक मजेदार प्रकार घडला आहे. मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिचा फोटो पीआयबीनं (PIB) आपल्या फेसबुक पेजवर (Facebook page) अपडेट (update) केला होता. सलग 23 तास केवळ तिचा फोटो (photo) मजकुराविना तसाच तिथे होता. या फोटोचं प्रयोजन काय ते पाहणाऱ्याला अजिबातच कळत नव्हतं. आता मात्र तासाभरापूर्वी पीआयबीला जाग आली. आणि त्यांनी या फोटोसह इतर काही फोटोजही पोस्टमध्ये ऍड केले. आणि सोबत मजकूरही लिहिला. आता या फोटोसोबत वाचायला मिळतं, की ‘जून (June) या नव्या सिनेमाचे (new cinema) दिग्दर्शक (director) वैभव खिस्ती आणि सुहृद गोडबोले हे या सिनेमातील मुख्य अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्यासह ‘इफ्फी’ मध्ये 19 जानेवारी 2021 रोजी सिनेमाच्या प्रदर्शनाप्रसंगी रेड कार्पेटवर (red carpet) उपस्थित होते. सोबतच सिनेमाची इतरही टीम दिसते आहे.’ आता नेहा पेंडसेच्या फोटोसह या टीमचे तीन फोटोज अपलोड केले गेले आहेत.
पीआयबी अर्थात प्रेस इन्फर्मेशन ब्युरो ही सरकारी संस्था.ही संस्था भारत सरकारची धोरणं, विविध कार्यक्रम आणि इतर कल्याणकारी योजनांविषयीची प्रसिद्धी करते. या सगळ्यांबाबत ती विविध वृत्तपत्रं आणि इलेक्टॉनिक माध्यमांना सतत माहिती देत असते. विविध जाहिराती, प्रेस नोट, विशेष लेख, संदर्भ साहित्य, प्रेस ब्रिफींग, छायाचित्रं, मुलाखती, दौरे यांची शासकीय माहिती पीआयबी माध्यमांपर्यंत पोचवत असते.