मुंबई, 13 सप्टेंबर: आजकाल बरेच लोक आपल्या घरी काही प्राणी पाळतात. त्यातही बहुतेक लोकांना कुत्रा पाळायला आवडतं. कुत्र्यांच्या अनेक जाती बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यापैकी काही स्वस्त तर काही अतिशय महाग आहेत. तरीही लोक ते विकत घेतात आणि आपल्या घरी आणतात. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणंच लोक या कुत्र्यांवर जीव लावतात. परंतु तरीही याचा अर्थ असा नाही की हे पाळीव कुत्रे कोणालाही चावू शकत नाहीत. आतापर्यंत अनेक घटनांमध्ये कुत्र्यांनी त्यांच्या मालकांचा किंवा इतर लोकांचा चावा घेतल्याचं समोर आलं आहे. काही प्रकरणांमध्ये लोक मरण पावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. म्हणूनच कुत्र्याचा मालक म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही असं न केल्यास, तुम्ही अडचणीत येऊ शकता. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. या गोष्टी लक्षात ठेवा :
- जर तुमच्याकडं पाळीव कुत्रा असेल तर त्याचं लसीकरण करणं ही तुमची जबाबदारी आहे. सध्या कुत्र्याला कोरोना लस मिसळून 7 लसी दिल्या जातात. हे लसीकरण सुमारे 4 महिन्यांत पूर्ण होते.
- जेव्हा जेव्हा कोणी पाहुणे, शेजारी, मूल, डिलिव्हरी बॉय वगैरे कोणीही अनोळखी व्यक्ती तुमच्या घरी येते, तेव्हा अशा परिस्थितीत तुमच्या कुत्र्याला बांधून ठेवण्याची जबाबदारी तुमची असते. तुम्ही असं न केल्यास तुमचा कुत्रा त्या व्यक्तींना चावू शकतो.
हेही वाचा: बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा
- लोक आपल्या कुत्र्याला रस्त्यावर किंवा कोणत्याही उद्यानात फिरायला घेऊन जातात. या दरम्यान कुत्र्याच्या तोंडावर असा मुखवटा घालण्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे जेणेकरून तो कोणालाही चावू नये. त्याच वेळी, आपल्याजवळ एक मजबूत काठी ठेवा.
- बरेच लोक त्यांच्या कुत्र्याला कुठेही सोबत घेऊन जाण्याच्या बेतात असतात. परंतु जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत हे लक्षात ठेवावे.
जर तुम्ही या चार गोष्टींची काळजी घेतली नाही आणि तुमचा कुत्रा एखाद्याला चावला तर अशा परिस्थितीत तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर दंड ठोठावण्याव्यतिरिक्त इतरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.