मुंबई, 08 जून : असे अनेक लोक आहेत, जे स्वत:चं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हे लोक योगा. डाइट, जीम या सारख्या गोष्टींवर जास्त लक्ष देतात. अशावेळी लोकांना दररोज वजन मोजण्याची सवय असते. लोक आपल्या आपल्या सवडीप्रमाणे वजन करतात. पण तुम्हाला माहितीय का की वजन करण्याची एक विशिष्ट वेळ असते. बरेच लोक संध्याकाळी वजन मोजतात, तर काही लोक सकाळी वजन करतात. स्वतःचे वजन करण्याचा सर्वोत्तम वेळ कधी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येकाला आपल्या वजनाबद्दल जाणून घ्यायचे असते. तुमचे वजन कधी कमी होत आहे आणि केव्हा वाढत आहे याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. वजनाचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असतो आणि निरोगी राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. वजन मोजण्यासाठी लोक सामान्यतः मशीन वापरतात. तुम्हीही तुमचे वजन आतापर्यंत अनेक वेळा मोजले असेल. तुम्ही कधी वेळ बघून तुमचे वजन केले आहे का? होय, जर तुम्ही दिवसभरात योग्य वेळी तुमचे वजन केले तरच तुम्हाला योग्य वजनाचा आकडा मिळेल. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी याची काळजी घ्यावी. आपले वजन दिवसातून अनेक वेळा चढ-उतारातून जात असते. तुमचे वजन ट्रॅक करण्यासाठी, दुपारी किंवा संध्याकाळी स्वतःचे वजन करणे टाळा. असे केल्याने, तुम्हाला योग्य वजन कळू शकणार नाही आणि तुमचे निरीक्षण योग्यरित्या केले जाणार नाही. यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी येऊ शकतात. मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, रिकाम्या पोटी वजन मोजण्यासाठी पहाटे ही सर्वोत्तम आणि अचूक वेळ आहे. तुमच्या शरीराचे योग्य वजन सकाळी कळते, कारण त्यावेळी पोट रिकामे असते आणि अन्नाचे वजन नसते. यामुळेच हा काळ वजन मोजण्यासाठी योग्य मानला जातो. जर हे शक्य नसेल तर व्यक्तीने दररोज वजन करण्याची एक वेळ ठरवली पाहिजे. मग तुम्ही ते दुपारी करा किंवा मग संध्याकाळी पण वेळ मात्र ठरलेली पाहिजे. वजन मोजताना 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिले वजनाचे यंत्र उत्तम दर्जाचे असावे. फक्त एक स्केल स्वीकारला पाहिजे. तसेच वजन करताना तोच ड्रेस किंवा चप्पल घालावे. यामुळे, वजनात बदल होण्याची शक्यता नगण्य असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.