सिडनी, 25 डिसेंबर : आपल्या बाळाचं नाव (BABY NAME) थोडं वेगळं, हटके असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे बाळाची चाहूल लागताच तेव्हापासूनच किंबहुना काही उत्साही जोडपी तर त्याआधीच आपल्या बाळाचं नाव ठरवतात. पूर्वी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर जन्मणाऱ्या बाळाला त्याचं नाव देण्याची पद्धत होती. त्यानंतर आपल्या आवडत्या हिरो-हिरोईन किंवा आदर्श व्यक्तीचं नाव बाळाला देऊ लागले. काही जण बाळाच्या जन्माचा दिवस, त्या दिवसाचं महत्त्वं किंवा नावाचा अर्थ समजून घेऊन तशा पद्धतीनं नावं ठेवू लागलं आणि आता तर काय नवरा-बायको आपल्या दोघांचं नाव एकत्र करून आपल्या बाळाला एक वेगळं अनोखं नाव देतात, असाच ट्रेंड आहे. नावात काय आहे असं म्हटलं जातं. पण एखादं अनोखं, हटके नाव असेल तर त्या नावाचं कौतुक होतंच. विचित्र नाव असेल तर त्यावर चर्चाही होते. पण बाळाचं नाव ठेवून कुणाला काही फायदा होत असेल असं क्वचितच. ऑस्ट्रेलियातील कपलच्या बाबतीच असंच काहीसं घडलं. या कपलनं आपल्या बाळाचं असं नाव ठेवलं आहे. नावात बरंच काही असतं हे या दाम्पत्य आणि त्याच्या बाळाच्या बाबतीत खरं ठरलं. बाळाच्या अनोख्या नावामुळे त्यांना डोमिनोज पिझ्झा तब्बल 60 वर्षे मोफत खायला मिळणार आहे. या दापम्त्याच्या बाळाचं नाव आहे, Dominic. त्याचा जन्म 9 डिसेंबर 2020 ला झाला. या दिवशी आपल्या बाळाचं असं नाव ठेवल्यानं डोमिनॉजनं त्यांना हे गिफ्ट दिलं आहे आणि याचं कारण म्हणजे या दापम्त्यानं डॉमिनोजची स्पर्धा जिंकली आहे.
60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियामध्ये डॉमिनोजनं एक स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या इन्स्टाग्राम पेजवर या स्पर्धेची घोषणा केली होती. 9 डिसेंबर 2020 जे बाळ जन्माला येईल त्याचं नाव Dominic किंवा Dominique ठेवावं मग त्यांना डोमिनॉज फिझ्झा फ्रीमध्ये खायला मिळणार. विशेष म्हणजे फक्त एकदाच नाही तर 6 दशकं म्हणजे तब्बल 60 वर्षे डोमिनॉज पिझ्झा खाण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत.
ही स्पर्धा जिंकली आहे ती क्लेमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथोनी लूत या दाम्पत्यानं. विशेष म्हणजे त्यांना या स्पर्धेबाबत काहीच माहिती नव्हती. त्यांनी आधीपासूनच आपल्या बाळाचं नाव Dominic ठेवायचं ठरवलं होतं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना या स्पर्धेबाबत समजलं आणि ते या स्पर्धेत सहभागी झाले. हे वाचा - 7 वर्षांच्या कॅप्टनने उडवलं प्रवासी विमान; लहानग्याचं कौशल्य पाहून नेटकरी हैराण! संपूर्ण ऑस्ट्रेलियात हे एकमेव दाम्पत्य होतं, ज्यांनी 9 डिसेंबर 2020 ला आपल्या बाळाचं नाव Dominic ठेवलं होतं. त्यामुळे हे कपल स्पर्धा जिंकलं. आता त्यांना 60 वर्षे डोमिनॉज पिझ्झा फ्रीमध्ये खायला मिळणार आहे. 2080 पर्यंत प्रत्येक महिन्याला 14 डॉलर्सचा पिझ्झा त्यांना मोफत मिळणार आहे.

)







