जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लहान वयातच तुमचं मूल प्रेमात पडलंय? चिडून, रागावून, ओरडून फायदा नाही, अशा प्रकारे हाताळा परिस्थिती

लहान वयातच तुमचं मूल प्रेमात पडलंय? चिडून, रागावून, ओरडून फायदा नाही, अशा प्रकारे हाताळा परिस्थिती

किशोरवयात प्रेमात पडलेल्या मुलांच्या पालकांसाठी टिप्स.

किशोरवयात प्रेमात पडलेल्या मुलांच्या पालकांसाठी टिप्स.

किशोरवयात एकमेकांप्रती असणाऱ्या आकर्षणाला कित्येक मुलं-मुली प्रेम समजतात. अशा वेळी पालकांनी नेमकं काय करायला हवं पाहुयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 ऑगस्ट : एक काळ होता जेव्हा मुलगा किंवा मुलगी थेट लग्नाच्या वेळीच आपल्या जोडीदाराला भेटत; मात्र सध्या अगदी लहान वयातही मुला-मुलींना गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असतात. किशोरवयात एकमेकांप्रति असणाऱ्या आकर्षणाला कित्येक मुलं-मुली प्रेम समजतात. अशा वेळी त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी एक पालक म्हणून त्यांना काही गोष्टी समजावणं (Parenting Tips) गरजेचं असतं; मात्र कित्येक पालक ही परिस्थिती शांतपणे न हाताळता मुलांवर ओरडणं, मारहाण करणं, धमकावणं अशा गोष्टींचा आधार घेतात. याचे दुष्परिणाम पुढे दिसून येतात. त्यामुळेच, अशा वेळी काय करावं (How to Handle love relationships of teenage kids) याबाबत काही माहिती घेऊ या. ‘ आज तक ’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मुलांचं वय समजून घ्या वयात येताना, म्हणजेच पौगंडावस्थेत (Parenting teenagers) मुला-मुलींच्या शरीरात कित्येक बदल घडत असतात. ही गोष्ट सर्वांसाठी अगदी सामान्य आहे. यामुळेच एकमेकांप्रति आकर्षण निर्माण होणं, आपल्यालाही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असावा अशी इच्छा वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या रिलेशनशिपबद्दल (Teenage relationships) माहिती मिळताच आधी या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांच्याशी याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्यापासूनच त्यांना विश्वासात घेतलं असेल, तर अशा गोष्टी ते तुमच्यापासून लपवत नाहीत. अन्यथा अशा गोष्टी ते तुमच्यापासून लपवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पहिल्यापासून इतर गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना कशा प्रकारे वागणूक देता हे महत्त्वाचं ठरतं. हे वाचा -  Height Increase Tips : मुलांची उंची वाढवायचीये? रोज 2 मिनिटे करा एक्स्पर्टने सांगितलेले हे काम मुलांना तुमच्या आधाराची गरज मुलांच्या रिलेशनबाबत कळल्यानंतर त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांच्याशी याबाबत चर्चा (Discuss with kids about their relationship) करणं हा सर्वांत योग्य पर्याय आहे. मुलांना या गोष्टीचा विश्वास वाटायला हवा की तुम्ही त्यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या बाजूने आहात. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहात हे त्यांना समजलं पाहिजे. अन्यथा, मुलं तुमच्यापासून दुरावली जाण्याची शक्यता असते. त्यांच्या ‘रिलेशनशिप’ला मान्यता (Don’t deny relationship of kids directly) देणं ही एक खूप अवघड गोष्ट आहे; मात्र थेट नकार देणंही मुलांच्या मनावर आघात करू शकतं. मुलांवर थेड ओरडण्याऐवजी आधी आपल्या जोडीदाराशी याबाबत चर्चा करणंही गरजेचं आहे. मुलांचे मित्र बना मूल मोठं होत असताना वयाच्या एका टप्प्यावर त्यांच्यात कित्येक हॉर्मोनल बदल (Hormonal changes during Teenage) होत असतात. टीनएजमध्ये मुलांमध्ये चिडचिड वाढते. त्यामुळे मुलांनी उलट बोलणं, सांगितलेलं न ऐकणं, विचित्र प्रकारे प्रतिक्रिया देणं या गोष्टी सर्वसाधारण असतात. यामुळे त्या मनावर घेऊ नका. अर्थात, मुलांना एखादी गोष्ट सांगायची असल्यास, ओरडण्याऐवजी एखाद्या मित्राप्रमाणे (Be friends with Kids) त्यांना समजावून सांगणं कधीही उत्तम. हे वाचा -  Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त प्रेमाबद्दल करा चर्चा एक पालक म्हणून मुलांसोबत प्रेम, रोमान्स, लैंगिक आकर्षण अशा गोष्टींवर चर्चा करणं कदाचित थोडे ऑकवर्ड (Discuss about love and relationships with your child) वाटू शकतं; मात्र सध्याच्या काळात अशा प्रकारच्या विषयांवर घरातूनच चर्चा सुरू होणं गरजेचं आहे. मुलांना इंटरनेट, सोशल मीडिया वा अन्य माध्यमातून चुकीची माहिती मिळण्याऐवजी, तुम्हीच मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधल्यास मुलांसाठी ते फायद्याचे ठरतं. अशा प्रकारच्या गोष्टींबाबत मोकळेपणाने संवाद साधल्यास मुलांनाही तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करणं सोपं जातं. तुम्हाला अशा गोष्टींबाबत मुलांशी संवाद साधणं अवघड वाटत असल्यास तुम्ही समुपदेशकाचीदेखील मदत घेऊ शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात