इस्लामाबाद, 25 सप्टेंबर : तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र-तारे तोडून देईन, असं सांगणारे कित्येक प्रियकर आणि पती आहेत. मात्र प्रत्यक्षात तसं शक्य तरी आहे का? मात्र पाकिस्तानातील (Pakistan) एका तरुणाने हे बोलून नाही तर प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. त्याने आपल्या बायकोला चक्क खराखुरा चंद्रच (Moon) दिला आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट (Wedding anniversary gift) म्हणून त्याने बायकोला हा चंद्र दिला आहे.
रावलपिंडीत राहणारा शोएब अहमदने आपल्या बायकोसाठी आकाशातील चंद्र तोडून पृथ्वीवर आणला नाही. मात्र थेट चंद्रावरच आपली जागा बनवली. चंद्राचा एका तुकडा त्याने खरेदी केला आहे. सी ऑफ वेपोर नावाचा एक प्लॉट चंद्रावर घेतला आहे, असा दावा त्याने केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार शोएबने आपण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं. सुशांतनेदेखील 2018 साली चंद्रावरील एक भूखंड खरेदी केला होता. सी ऑफ मस्कोवी असं या भूखंडाचं नाव. त्याने इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्रीमधून 45 डॉलर्सला ही जागा आपल्या नावावर केली होती.
हे वाचा - नशीबच फळफळलं! जुनी कार विकणारे बापलेक एकाच दिवसात करोडपती; कमावले 51 हजार कोटी
शोएबने जेव्हा आपल्या पत्नीला चंद्रावरील जागा गिफ्ट केली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. शोएबची पत्नी मदीहाने आपल्या पतीकडून मिळालेल्या अनोख्या गिफ्टबाबत आपल्या नातेवाईकांना, मैत्रिणींनाही सांगितलं. सुरुवातीला कुणालाच यावर विश्वास बसला नाही. सर्वांनी तिला हसण्यावर घेतलं. मात्र जेव्हा तिनं याचे दस्तावेज दाखवले तेव्हा त्यांना विश्वास बसला आणि त्यांनीही कौतुक केलं.
सुशांत सिंह राजपूतशिवाय शाहरूख खान आणि हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझसह अनेक सेलिब्रिटींनी चंद्रावर प्लॉट घेतला आहे. पाकिस्तानच्या या दाम्पत्याला चंद्रावरील जमीन खरेदीबाबतचे दस्तावेज यूएस पोस्टल सर्व्हिसमार्फत त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत.
हे वाचा - Timeच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी यांच्याखेरीज आहेत वैज्ञानिक आणि रॅपरह
याआधी बिहारच्या बोधगयातील व्यापारी नीरज कुमार यांनीदेखील चंद्रावर एक एकर जमीन घेतली होती. त्यांनी सांगितलं होतं, चंद्रावरील जमिनीच्या जागेची किंमत जास्त नाही मात्र त्याची खरेदीची प्रक्रिया खूप किचकट आहे. त्यांनी अमेरिकेतल्या लुना सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेशी संपर्क केला होता आणि ऑक्टोबर 2019 मध्ये चंद्रावरील एक एकर जमीन खरेदीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी त्यांनी यासाठी जवळपास 48 हजार रुपये दिले होते. ऑनलाइन दस्तावेज जमा केल्यानंतर 4 जुलै, 2020 रोजी त्यांचं काम झालं असा मेसेज त्यांना आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.