Home /News /lifestyle /

Oxidised jewellery मुळे मिळतो हटके लुक; मात्र खरेदीपूर्वी 'या' गोष्टींची खबरदारी घ्या!

Oxidised jewellery मुळे मिळतो हटके लुक; मात्र खरेदीपूर्वी 'या' गोष्टींची खबरदारी घ्या!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidised jewellery) वापरण्याकडे महिलांचा कल वाढतो आहे. या ज्वेलरीमुळे तुम्हाला हवा तसा रॉयल व्हिंटेज लूकही (Vintage look with oxidised jewellery) मिळतो.

    नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : कमी किंमत, हलकं वजन आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली डिझाइन्स यांमुळे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidised jewellery) वापरण्याकडे महिलांचा कल वाढतो आहे. या ज्वेलरीमुळे तुम्हाला हवा तसा रॉयल व्हिंटेज लूकही (Vintage look with oxidised jewellery) मिळतो. तसेच यामध्ये अनेक प्रकारची ट्रेंडी डिझाइन्सही उपलब्ध असतात. अर्थात, अशा प्रकारची ज्वेलरी खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी (Tips to buy oxidised jewellery) बाळगणंही आवश्यक आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच आजकाल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी वापरताना दिसून येत आहेत. किंमत कमी असते, त्यामुळे आपण बऱ्याच वेळा त्याची देखभाल नीट करत नाही; मात्र खबरदारी बाळगली नाही तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीही मोठ्या प्रमाणात काळी (Avoid blackening of oxidised jewellery) पडण्याचा धोका असतो. यामध्ये असलेल्या सिव्हर सल्फाइडमुळे याचा रंग तसा आधीपासून थोडासा काळसर असतो; मात्र प्रमाणापेक्षा जास्त काळी पडल्यास ही ज्वेलरीदेखील खराब दिसू लागते. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Jewellery buying tips) घेताना त्यांची क्वालिटी पाहून मगच खरेदी करावी. हे दागिने कोणत्या धातूपासून बनवले आहेत, याची खातरजमा नीट करून घ्यावी. कित्येक वेळा हलक्या प्रतीचे धातू वापरून हे दागिने तयार करण्यात आलेले असतात. यामुळे तुमच्या त्वचेला रिअॅक्शन किंवा अॅलर्जी होण्याचाही धोका असतो. त्यामुळेच, असे दागिने घेताना क्वालिटी, वॉरंटी आणि गॅरंटी या गोष्टी नीट तपासून घ्याव्यात. हे ही वाचा-केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं? यासाठी तुम्ही ओळखीच्या किंवा रेप्युटेड दुकानातूनच ज्वेलरी घेण्याचा विचार करावा. ऑनलाइन खरेदी करत असाल, तर ज्वेलरीचा ब्रँड, प्रॉडक्ट रिव्ह्यू आणि वेबसाइटची सत्यता इत्यादी गोष्टींची पडताळणी करूनच खरेदी करावी. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी साधारणपणे समारंभात किंवा मग दररोजच्या वापरासाठीही घेतली जाते. ही ज्वेलरी वजनाला हलकी (Always prefer lightweight jewellery) असणं अधिक सोईचं असतं. त्यामुळे अशा प्रकारची ज्वेलरी घेताना वजन तपासूनच घ्यावी. बहुतांश वेळा ही ज्वेलरी जेवढी स्वस्त तेवढी जास्त वजनदार अशी असते. त्यामुळे अशा वेळी पैशांपेक्षाही तुमच्या कम्फर्टचा विचार करून मगच योग्य निर्णय घ्यावा. घरात ठेवलेली असतानाही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची (How to take care of oxidised jewellery) काळजी घेणं गरजेचं असतं. विशेषतः पावसाळ्यात किंवा दमट वातावरणात ही ज्वेलरी खराब होण्याचा धोका अधिक असतो. अशा वेळी एका हवाबंद डब्यामध्ये कापूस ठेवून त्यात ही ज्वेलरी ठेवावी. त्यामुळे ही ज्वेलरी लवकर खराब होणार नाही. अशा प्रकारे विविध गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचं आयुष्य आणखी वाढवू शकता.
    First published:

    Tags: Beauty tips, Fashion, Jewellery shop

    पुढील बातम्या