कोरोना उद्रेकाच्या संकटाचा 2 आठवडे आधीच मिळणार इशारा; भारतीय शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला

कोरोना उद्रेकाच्या संकटाचा 2 आठवडे आधीच मिळणार इशारा; भारतीय शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला

भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाला (coronavirus) रोखण्यासाठी शोधलेल्या या पद्धतीचा अवलंब फक्त भारतातच नाही तर जगभरात करण्याची गरज असल्याचं विदेशातील शास्त्रज्ञ म्हणालेत.

  • Share this:

गांधीनगर, 06 जानेवारी : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) विविध रूपं जगभरात समोर येत आहेत. त्यानंतर आता कोरोनावर विविध संशोधन देखील सुरू आहेत. जगभरात अनेक संस्थांमध्ये कोरोनावर संशोधन सुरू असून यामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकतंच कोरोना विषाणू 2 तास हवेत राहत असल्याची नवीन माहिती समोर आल्यानंतर आता 2 आठवडे आधीच आपल्याला कोरोनाची लक्षणं समजणार असल्याचं नवीन संशोधनात समोर आलं आहे. सांडपाण्यावर (Waste Water)  लक्ष ठेवल्याने आपल्याला 2 आठवडे आधीच कोरोनाचा प्रकोप लक्षात येणार असल्याचे या नवीन संशोधनात समोर आले आहे.

गुजरातच्या गांधीनगर मधील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Gandhinagar) च्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात हा दावा  केला आहे. हे संशोधन गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (GPCB) सहकार्याने करण्यात आला होता आणि हे संशोधन पर्यावरण संशोधन संस्थेच्या जर्नलमध्ये आहे. या संशोधन पथकात गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (GBRC) च्या वैज्ञानिकांचाही समावेश होता.

अभ्यासानुसार त्यांनी गांधीनगरमधील कचर्‍याच्या पाण्यात असलेल्या SARS-CoV-2 (कोरोना विषाणू) मधील अनुवांशिक विषाणू आणि कोविड 19 मधील प्रकरणांचा केला.  संशोधकांनी घेतलेल्या 43 नमुन्यांमध्ये 40 नमुन्यांमध्ये SARS-CoV-2 हा विषाणू आढळून आला होता.  मागील वर्षी मे महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या अभ्यासावर  हे संशोधन आधारित असून यामध्ये सर्वात आधी सांडपाण्यातील कोरोना विषाणू सर्वात आधी सापडले होते. या संशोधनात मागील वर्षी सात ऑगस्ट ते  30 सप्टेंबर दरम्यान वैज्ञानिकांनी या सांडपाण्याचे 43 नमुने घेतले होते. यामध्ये आठवड्यात 2 वेळा हे नमुने घेतले होते. या नमुन्यांवर करण्यात आलेल्या अध्ययनात संशोधकांना SARS-CoV-2 हा व्हायरस सापडला आहे.

हे वाचा - तुम्ही कोरोना लस घेणार का? मोदी सरकार लसीकरणासाठी सज्ज असताना 69% लोक संभ्रमात

या संशोधनात सहभाग असलेले आयआयटी गांधीनगर (IIT Gandhinagar) येथील पृथ्वी विज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि संशोधन प्रमुख मनीष कुमार यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले, या संशोधनात सांडपाण्यावर लक्ष ठेवल्याने आपल्याला कोरोनाचा प्रकोप 2 आठवडे आधीच लक्षात येणे खूपच उत्साहवर्धक आहे. आम्ही लवकरच यासंदर्भातील माहिती अधिकाऱ्यांना देणार आहोत.

या नवीन संशोधनाची कोरोना रोखण्यासाठी खूप मदत होणार आहे. कोरोनाच्या या लढ्यात सांडपाण्यावर लक्ष ठेवण्याच्या पद्धतीचा देखील समावेश करण्याची गरज आहे. याचबरोबर स्वीडनमधील केटीएच रॉयल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर प्रसून भट्टाचार्य यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात कोरोना रोखण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे.

हे वाचा - धक्कादायक! UK मध्ये 9 महिन्यांत पहिल्यांदाच दिवसभरात 1000 कोरोना बळी

याविषयी माहिती देताना नॉट्रेडम विश्वविद्यालयातील एरोल बिविन्स यांनी म्हटले, या संशोधनात आम्हाला सांडपाण्यामध्ये SARS-CoV-2 हा विषाणू आढळून आल्यानंतर रुग्णांमध्ये देखील आढळून आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी असणाऱ्या भागामध्ये याचे नमुने तपासून आपण या भागातील व्यक्ती संक्रमित आहेत कि नाही याचा तपास करू शकतो.

Published by: Priya Lad
First published: January 6, 2021, 10:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading