मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नव्या रुग्णांसह मृत्यूही वाढले; UK मध्ये 9 महिन्यांत पहिल्यांदाच दिवसभरात 1000 कोरोना बळी

नव्या रुग्णांसह मृत्यूही वाढले; UK मध्ये 9 महिन्यांत पहिल्यांदाच दिवसभरात 1000 कोरोना बळी

ब्रिटनसमोरील (britain) कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संकट आता पुन्हा वाढू लागलं आहे.

ब्रिटनसमोरील (britain) कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संकट आता पुन्हा वाढू लागलं आहे.

ब्रिटनसमोरील (britain) कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संकट आता पुन्हा वाढू लागलं आहे.

ब्रिटन, 06 जानेवारी : भारतात कोरोनाच्या (CORONAVIRUS) नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाच्या आकडेवारीबाबत भारताचं चित्र जगात दिलासादायक आहे. मात्र यूकेत (UK) उद्रेक झालेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या दहशतीत आता तिथलं संकट अधिक वाढलं आहे. ब्रिटनमधील (BRITAIN) कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीसह आता मृत्यू संख्याही वाढली आहे. 9 महिन्यांत पहिल्यांदाच दिवसभरात 1000 कोरोना बळी घेतले आहेत. यूकेतील ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

AFP वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार यूकेत आज कोरोनामुळे  1,000 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यूकेसाठी ही चिंताजनक बाब आहे.

यूकेत नव्या कोरोनामुळे कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढते आहे. कारण हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आहे, वेगानं पसरणारा आहे. त्यामुळे  ब्रिटनमध्ये  पुन्हा एकदा लॉकडाउनलागू करण्याची घोषणा  पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी केली. लॉकडाउनमध्ये जखडलेल्या जगाने आता कुठे कोरोनाच्या महामारीतून सुटका करून घेतली होती. तेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा विषाणू आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. मागील दोन आठवड्यांपासून ब्रिटनमध्ये खबरदारी घेतली जात आहे. अखेर शेवटचा तोडगा म्हणून ब्रिटनमध्ये आता लॉकडाउन करण्यात आले आहे.

हे वाचा - ही तर नागरिकांची सामूहिक कत्तल! थिएटर निर्णयावर डॉक्टरनं या सरकारला सुनावले बोल

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन खूप वेगात पसरल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे. इम्पीरियल कॉलेजने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमधील सर्व शाळा सुरु असताना संबंधित डेटा गोळा केला होता. वैज्ञानिकांच्या मते, केवळ 20 वर्षांखालील लोकांनाच नव्हे तर इतर वयोगटातील लोकांनाही या नव्या विषाणूची वेगाने लागण होत आहे. ब्रिटनमध्ये जवळपास तीनपट ही नवीन प्रकरणं वाढली आहेत.

दरम्यान दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे.याठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca च्या कोविशिल्ड आणि फायझर या लशी दिल्या जात आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Uk