मुंबई, 28 डिसेंबर : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनचे विविध फोटो सध्या व्हायरल होतात. या ऑप्टिकल इल्युजनमधली विशिष्ट वस्तू, प्राणी काही सेकंदांत ओळखण्याचं आव्हान नेटिझन्सना दिलं जातं. तुम्हीही अनेकदा असं आव्हान स्वीकारलं असेल. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत. यामध्ये फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधण्याचं आव्हान देण्यात आलंय. काही ऑप्टिकल इल्युजन अशी असतात, जी समजण्यास बराच वेळ लागतो. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक ऑप्टिकल इल्युजनचं कोडं घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला एका फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधायचा आहे. हा फोटो एका बेडरूमचा आहे. या फोटोतला कुत्रा शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ तीक्ष्ण नजरच नाही, तर तीक्ष्ण बुद्धीसुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्ही हे ऑप्टिकल इल्युजनचं सोडवण्यास यशस्वी झालात, तर तुम्हीही जीनिअस व्यक्तींच्या यादीत समाविष्ट व्हाल. हेही वाचा - वस्तूंच्या गर्दीत लपलीय चॉकलेट पुडिंग, १० सेकंदात शोधून दाखवाल तरच ठराल हुशार जीनिअस असाल, तर उत्तर शोधा या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे यात कुत्रा अजिबात दिसत नाही. बेडच्या आजूबाजूला अनेक वस्तू पडल्याचं फोटोमध्ये दिसतं. बेडवरचं बेडशीट व उशीही अस्ताव्यस्त दिसते. या सगळ्यात कुत्रा सहजासहजी दिसत नाही. तुम्हाला हा कुत्रा सापडला, तर तुम्हाला नक्कीच जीनिअस म्हटलं जाईल. ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो विचारक्षमतेला आव्हान देणारा आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेणारा आहे. ऑप्टिकल इल्युजनची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे, की युझर्सचं लक्ष गुंतवून ठेवतं, आणि मनासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. त्याच पद्धतीचा हा फोटो असून यामध्ये घराची बेडरूम दिसत आहे व त्यात एक कुत्रा शोधायचा आहे. कुठे आहे कुत्रा? फोटोमध्ये हा कुत्रा बेडवर बसला आहे. तुम्ही नीट पाहिलं, तर चादरीच्या पुढच्या भागाच्या मध्यभागी कुत्र्याच्या चेहऱ्याचा थोडासा भाग बाहेर आलेला दिसतोय. हा कुत्रा तिथेच झोपलेला असल्याचं दिसतं. फोटोमध्ये कुत्रा अशा पद्धतीने आहे की तो सहजासहजी दिसत नाही. परंतु काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर कुत्रा कुठे आहे हे कळतं. एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, मानसिक क्षमता आदी गोष्टींची पारख करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचा उपयोग होतो. आकलनशक्ती, एकाग्रता आदींविषयीची माहितीही ऑप्टिकल इल्युजनच्या माध्यमातून मिळते. सोशल मीडियावर सध्या हा प्रकार खूपच चर्चेत आहे. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने ऑप्टिकल इल्युजनचं आकलन होत असतं. त्यामुळेच अनेक जण हे आव्हान स्वीकारताना दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.