मुंबई 27 डिसेंबर : आपला मेंदू कसं कार्य करू शकतो, याबद्दल ऑप्टिकल इल्युजन्स काही आकर्षक तथ्ये आपल्या समोर मांडतात. रंग, प्रकाश आणि पॅटर्न्स यांची विशिष्ट रचना आपल्या मेंदूची फसवणूक करू शकते, हे एव्हाना सिद्ध झालं आहे. ऑप्टिकल इल्युजनचे भौतिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक यांसारखे अनेक प्रकार पडतात. हा घटक मनोविश्लेषण क्षेत्राचा एक भाग आहेत. कारण, त्यातून आपल्याला गोष्टी कशा समजतात यावर थोडा प्रकाश टाकता येतो. या ठिकाणी असंच एक ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारा फोटो देण्यात आला आहे. या फोटोमध्ये खूप खेळण्यांच्या गर्दीमध्ये एक पुडिंग (गोड खाद्यपदार्थ) दडलेलं आहे. हे पुडिंग सात सेकंदांमध्ये शोधून दाखवण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. अनेकांना हे पुडिंग शोधण्यात अपयश आलं आहे.
हे ही पाहा : पापा की परींचा स्कूटी चालवताना असा प्रकार, अखेर स्वत:चं तोंड करुन घेतलं काळं, पाहा Video
या ठिकाणी शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये लहान मुलांच्या अनेक खेळणी आहेत. या खेळण्यांच्या पसाऱ्यात फळं, भाज्या, कपडे आणि प्राणीदेखील दिसतील. या सर्वांच्यामध्ये दडलेलं पुडिंग सात सेकंदात शोधून दाखवायचं आहे. तुम्ही या फोटोकडे अगदी बारकाईने बघितलं आणि काळजीपूर्वक प्रत्येक वस्तूचं निरीक्षण केलं तर तुम्हाला पुडिंग शोधता येईल. चांगलं निरीक्षण कौशल्य असलेल्या व्यक्ती मर्यादित वेळेत पुडिंग शोधण्यात यशस्वी होतील. फोटोमध्ये दडलेल्या पुडिंगवर चेरी टॉपिंग आहे. खूप प्रयत्न करूनही पुडिंग नसेल सापडलं तर फोटोच्या उजव्या बाजूला काळजीपूर्वक बघा. तिथे निळ्या रंगाच्या दोन डॉल्फिन खेळण्यांच्या शेजारी पुडिंग दडलेलं आहे. व्यक्तीची कॉग्निटिव्ह क्षमता वाढवण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन्स उपयुक्त ठकतात. ऑप्टिकल इल्युजन्स हा डोळ्यांसमोर तयार केलेला भ्रम असतो. नियमित सराव केल्यास कोणीही चटकन हा भ्रम समजून घेण्याच्या क्षमतेवर प्रभुत्व मिळवू शकतो. ऑप्टिकल इल्युजन्सच्या सहाय्याने तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि गोष्टींचं निरीक्षण करण्याची क्षमता तपासू शकता.
ऑप्टीकल इल्यूजन
मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी हा फार सोपा व्यायाम आहे. आपल्या बुद्धिमत्तेचं मूल्यांकन करण्याची ही एक विश्वासार्ह पद्धत मानली जाते.
सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ट्रीकी फोटोज्, रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न व्हायरल होतात. लोकांनादेखील असे गोंधळात टाकणारे रिडल्स आणि लॉजिकल रिजनिंगशी संबंधित प्रश्न सोडवायला आवडतात. खरं तर असे ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरले जातात. मात्र, सोशल मीडियामुळे सध्या लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचं देखील या ऑप्टिकल इल्युजन्सच्या मदतीनं चांगलं मनोरंजन होत आहे.