मुंबई, 01 फेब्रुवारी : दृष्टिभ्रमाची छायाचित्रं किंवा चित्रं बुद्धीचा कस पाहणारी असतात. यात डोळ्यांना दिसतं तेवढंच सत्य नसून बुद्धीनुसार तर्क लावायचा असतो. अनेकांना ही कोडी उलगडत नाहीत. जे खरोखर बुद्धिमान असतात, त्यांनाच ती सोडवणं शक्य होतं. ऑप्टिकल इल्युजन्स म्हणजे दृष्टिभ्रमाचे खेळ व्यक्तिमत्त्व विकासासाठी, तसंच बुद्धिमत्ता तल्लख करण्यासाठी खेळले जातात. सोशल मीडियावर अशी चित्रं व छायाचित्रं भरपूर व्हायरल होतात. असंच एक दृष्टिभ्रमाचं छायाचित्र सध्या मीडियावर व्हायरल होतंय. या छायाचित्रात लपलेला सिंह युझर्सना 10 सेकंदांमध्ये शोधायचा आहे.
या वेळी वाचकांना देण्यात आलेलं कोडं खूप सुंदर आहे. या कोड्यासाठी वापरण्यात आलेलं चित्र फॉल सीझनचं आहे. त्यामुळे त्यात लाल, केशरी, पिवळा, तपकिरी अशा रंगांच्या विविध छटा दिसतात. हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण चित्रात लपलेला सिंह इतक्या सुंदर पद्धतीनं चित्रात समाविष्ट करण्यात आलाय, की तो सहजासहजी सापडत नाही. त्यामुळे अनेकांना हे आव्हान पेलणं खूपच कठीण गेलंय. अर्थात काही जण बुद्धिमत्तेचा वापर करून हे कोडं नक्कीच सोडवू शकतात. त्यासाठी 10 सेकंदांचा वेळ देण्यात आलाय.
हेही वाचा - Breast Cancer in Men : पुरुषांनाही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
तीक्ष्ण नजर आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावरच अशी कोडी सोडवता येतात. अनेकदा निरीक्षणकौशल्य कमी पडतं. त्यामुळे कोडी लवकर सुटत नाहीत. ज्यांना ही कोडी सोडवायची सवय असते, त्यांना त्यामागची ट्रिक लगेच कळू शकते. तुम्हाला हे कोडं सुटत नसेल, तर काळजी करू नका. वर दिलेल्या चित्रात सिंह कुठे लपलाय, हे सहज कळू शकतं. एका झाडाच्या बाजूलाच सिंह दिसतोय; मात्र तो त्या रंगांमध्ये व आकारांमध्ये बेमालूमपणे मिसळला आहे.
ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाचा उपयोग मानसशास्त्रामध्ये केला जातो. दृष्टिभ्रम म्हणजे एखाच्या वस्तूची, गोष्टीची डोळ्यांना फसवणारी प्रतिमा. दृष्टिभ्रम भौतिक, शारीरिक आणि आकलनात्मक असे तीन प्रकारचे असतात. माणसाचा मेंदू गोष्टींचं आकलन कसं करतो, हे जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रातही दृष्टिभ्रमाचा वापर केला जातो. एखाद्या चित्राकडे किंवा परिस्थितीकडे सामान्य माणूस खूप वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांमधून पाहू शकतो. मेंदूला अधिक तल्लख करण्याच्या दृष्टीनं दृष्टिभ्रम खूप फायदेशीर ठरतात. विशिष्ट प्रकारची रंगसंगती, प्रकाशयोजना, आकार यांच्यामुळे आपला मेंदू नसलेल्या गोष्टीची प्रतिमा तयार करतो. मेंदूची गोष्टी समजून घेण्याची क्षमता ओळखण्यात याचा फायदा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral photo